Shahid Afridi : IND vs PAK सामन्यात माझ्या मुलीने तिरंगा फडकावला, शाहिद आफ्रिदीचा दावा

IND vs PAK हाय व्होल्टेज मॅचमध्ये पाहण्यासाठी 4 सप्टेंबर दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गेले होते यावेळी शाहिद आफ्रिदीच्या मुलीने भारताचा झेंडा फडकावला
shahid afridi daughter waved india flag during india vs pakistan asia cup 2022
shahid afridi daughter waved india flag during india vs pakistan asia cup 2022

Shahid Afridi Daughter Waved India Flag During : UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कप 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले. साखळी सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला, परंतु बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने सुपर-4 फेरीत भारतीय संघाचा 5 गडी राखून पराभव केला. आता आशिया कप 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तान आणि श्रीलंका त्यांच्यात खेळला जाणार आहे.

shahid afridi daughter waved india flag during india vs pakistan asia cup 2022
Team India : पंतमुळे 'या' खेळाडूचं करिअर उद्ध्वस्त! कधी मिळणार टीम इंडियात संधी!

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या फायनलपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मोठा दावा केला आहे. आफ्रिदीने म्हणाला की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटच्या हायव्होल्टेज सामन्यात स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या माझ्या मुलीने भारताचा झेंडा फडकावला होता. आफ्रिदीने समा टीव्हीवर खुलासा केला की त्याचे कुटुंब 4 सप्टेंबर रोजी थेट सामना पाहण्यासाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये गेले होते.

आफ्रिदी म्हणाला, माझ्या पत्नीने मला सांगितले की स्टेडियममध्ये 10% पाकिस्तानी चाहते होते आणि बाकीचे भारतीय चाहते होते. पाकिस्तानी झेंडे नव्हते म्हणून माझी धाकट्या मुलीने भारताचा झेंडा फडकवला. मला व्हिडिओ सापडला, पण तो ऑनलाइन शेअर करायचा की नाही याबद्दल मी द्विधा मनस्थितीत होतो.

shahid afridi daughter waved india flag during india vs pakistan asia cup 2022
PAK vs SL Asia Cup Final: लंकेला सहाव्यांदा तर पाकला तिसऱ्यांदा 'चॅम्पियन' बनायचे संधी

भारत आशिया चषक सुपर फोरमधील पहिले दोन सामने गमावून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. तर पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. सुपर फोरमधील शेवटच्या सामन्यात पाकिस्तानचा संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला असला तरी रविवारी होणाऱ्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. दुबईत मात्र नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरली असून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com