Axar Patel :आम्हाला वाटलं जडेजा नाही आता... खुद्द कांगारूंच्या प्रशिक्षकाने बापूची पाठ थोपटली

Australian Cricket Team Coach Andrew McDonald  Applaud Axar Patel Performance
Australian Cricket Team Coach Andrew McDonald Applaud Axar Patel PerformanceESAKAL

Axar Patel Ravindra Jadeja : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक टी 20 सामन्यात अक्षर पटेलने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला वेसन घातले. अक्षर पटेलने अॅरोन फिंच, जॉश इंग्लिस आणि फॉर्ममध्ये असलेल्या मॅथ्यू वेडची शिकार केली. त्याने 4 षटकात 33 धावा देत 3 विकेट घेतल्या. विशेष म्हणजे त्याने एक झेल जरी सोडला तरी अप्रतिम थ्रो करत धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये धाडले. अक्षर पटेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, अक्षर पटेलवर ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड जाम खूष दिसले. (Australian Cricket Team Coach Andrew McDonald Applaud Axar Patel Performance)

Australian Cricket Team Coach Andrew McDonald  Applaud Axar Patel Performance
Rohit Sharma : स्लॉग ओव्हरची चिंता नाही! बुमराह अन् हर्षलबद्दल कर्णधार रोहित म्हणाला...

सामना झाल्यानंतर मॅकडोनाल्ड यांनी अक्षर पटेलचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, 'अक्षर पटेलसाठी ही मालिका खूप चांगली गेली. ज्यावेळी भारतीय संघातून जडेजा बाहेर गेला त्यावेळी सर्वांना वाटले की ही आता भारताची दुखरी नस ठेरले. मात्र भारताला दुसरा जडेजा सापडला.'

Australian Cricket Team Coach Andrew McDonald  Applaud Axar Patel Performance
MS Dhoni : धोनीची 'ती' पत्रकार परिषद होतीय ट्रोल, खोटा गंभीरसुद्धा घेतोय मज्जा

आगामी वर्ल्डकपसाठी कोणत्या गोष्टी डोकेदुखी ठरतील असे विचारले असता मॅकडोनाल्ड म्हणाले, 'या संपूर्ण मालिकेत रन रेट जास्त होता. हे मनोरंजनाचं क्रिकेट आहे. बॅट बॉलवर भारी पडत होती. त्यामुळे गोलंदाजांना स्लॉग ओव्हरमध्ये लपण्याची जागात नव्हती.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही काही योजना आखली होती. त्याचे काही चांगले रिझल्ड देखील मिळाले आहेत. आम्ही त्याचा वापर आगामी वर्ल्डकपसाठी देखील करू.' मॅकडोनाल्ड यांनी वर्ल्डकमध्ये संघात मिचेल स्टार्क, स्टायनिस आणि डेव्हिड वॉर्नर संघात परततील असे सांगितले. स्टार्क परतल्याने गोलंदाजीची धार अजूनच वाढेल असे ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com