
VIDEO: कॅरीचा पाकिस्तानातील स्विमिंगपूल मधला 'हा' किस्सा होतोय व्हायरल
ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ सध्या ऐतिहासिक पाकिस्तान दौऱ्यावर (Australia Tour Of Pakistan) आहे. रवळपिंडी येथील पहिली कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर कांगारूंचा संघ आता दुसऱ्या कसोटीसाठी तयारी करत आहे. पाकिस्तानात क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत कायम साशंकता असते त्यामुळे पीसीबीने ऑस्ट्रेलिया संघाच्या हॉटेलबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर अॅलेक्स कॅरीबाबत (Alex Carey) पाकिस्तानच्या हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये (Swimming Pool) जे काही घडले त्याला ते विचारे सुरक्षा रक्षकही काही करू शकणार नव्हते.
हेही वाचा: VIDEO: हिल्टनचा हा भन्नाट कॅच पाहताना श्वास नक्कीच अडकेल
पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ हॉटेलमध्ये पोहचला त्यावेळी स्विमिंग पूलच्या आसपास चालत होता. याचवेळी अॅलेक्स कॅरी बोलता बोलता बॅगसह स्विमिंग पूलमध्ये पडला. त्याचा हा व्हिडिओ (Video) संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins) आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओत कॅरी आपल्या संघसहकाऱ्यांसोबत पाठीमागे वळून बोलत होता. बोलता बोलता कॅरी स्विमिंगपूलच्या काठावर पोहचला. मात्र ज्यावेळी त्याच्या लक्षात आले की आपण स्विमिंगपूलच्या जवळ पोहोचलो आहे तोपर्यंत त्याचा तोल गेला होता. अखेर कॅरीने पाठीवरच्या बॅगसह पाण्यात पडला.
हेही वाचा: VIDEO : मॅच फिरवणारा रॉकेट थ्रो; पाकच्या पदरी पराभवाची हॅटट्रिक
ऑस्ट्रेलियाचा (Australia) पहिला कसोटी सामना रावळपिंडीमध्ये झाला होता. या सामन्यात पाच दिवसात फक्त 14 विकेट पडल्या होत्या. पाकिस्तानने (Pakistan) पहिल्या डावात 4 बाद 476 धावा ठोकल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाने देखील सर्वबाद 459 धावा केल्या. पाकिस्तानने आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद 200 च्यावर धावा केल्या मात्र पाच दिवसांचा खेळ संपल्याने सामना अनिर्णित स्थिती संपला. आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना कराचीमध्ये खेळवला जाणार आहे.
Web Title: Australian Cricketer Alex Carey Swimming Pool Video Of Pakistan Hotel Gone Viral
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..