

Australian Open Badminton 2025
sakal
सिडनी : भारतीय बॅडमिंटनपटूंना गुरुवारी ऑस्ट्रेलियन ओपन या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये संमिश्र यशाचा सामना करावा लागला. एकीकडे लक्ष्य सेन, आयुष शेट्टी यांनी पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला, तर दुसरीकडे एच. एस. प्रणोय, किदांबी श्रीकांत, तरुण मानेपल्ली यांचे आव्हान पराभवामुळे संपुष्टात आले. दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीनेही पुढे पाऊल टाकले.