
सर्बियाचा अनुभवी टेनिसपटू नोवाक जोकोविच व स्पेनचा युवा स्टार कार्लोस अल्काराझ यांच्यामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुष एकेरी विभागाची उपांत्यपूर्व लढत रंगणार आहे.
जोकोविच याने चौथ्या फेरीत झेक प्रजासत्ताकच्या जिरी लेहेका याच्यावर सरळ तीन सेटमध्ये विजय साकारला. युनायटेड किंगडमच्या जॅक ड्रेपर याने माघार घेतल्यामुळे ७-५, ६-१ असा आघाडीवर असताना कार्लोस अल्काराझला बाय (पुढे चाल) देण्यात आले. आता जोकोविच-अल्काराझ यांच्यामधील लढतीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.