

Satwik–Chirag
sakal
सिडनी : यंदाच्या आंतरराष्ट्रीय मोसमामध्ये भारतीय खेळाडूंना एकेरी विभागामध्ये जेतेपदापासून सातत्याने दूर राहावे लागत असल्यामुळे उद्यापासून (ता. १८) सुरू होत असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताची मदार पुन्हा एकदा सात्त्विक साईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी या जोडीवर असणार आहे. या जोडीला यंदाच्या मोसमातील पहिल्यावहिल्या जेतेपदाची आस असणार आहे.