Australian Open:तारोने अँडी मरेची दुसऱ्याच फेरीत केली बॅग पॅक

Australian Open Taro Daniel Defeat 3 Grand Slam Winner Andy Murray
Australian Open Taro Daniel Defeat 3 Grand Slam Winner Andy Murrayesakal

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open) आज ( दि. २०) जपानचा जागतिक क्रमवारीत १२० व्या स्थानावर असणारा तारो डॅनियलने (Taro Daniel) तीनवेळा ग्रँडस्लॅम (Grand Slam) जिंकणाऱ्या अँड मरेला (Andy Murray) पराभवाचा धक्का दिला. तारोने दुसऱ्याच फेरीत अँडी मरेचा ६-४, ६-४, ६-४ असा पराभव केला. हा सामना २ तास ४८ मिनिटे सुरू होता. (Australian Open Taro Daniel Defeat 3 Grand Slam Winner Andy Murray in 2nd Round)

Australian Open Taro Daniel Defeat 3 Grand Slam Winner Andy Murray
LCL: सेहवागच्या ऐवजी कैफ का करणार इंडिया महाराजाचं नेतृत्व?

तिसऱ्याच गेममध्ये तारोने (Taro Daniel) मरेची सर्व्हिस ब्रेक करत ३ - १ अशी आघाडी घेतली. त्यानंतर मरेने झुंजार खेळ करत ३ -३ अशी बरोबरी केली. मात्र पुढच्याच गेममध्ये जपानच्या तारोने मरेची सर्व्हिस पुन्हा ब्रेक करत ४ -३ अशी आघाडी घेतली. अखेर त्याने पहिला सेट ६ - ४ असा जिंकला.

Australian Open Taro Daniel Defeat 3 Grand Slam Winner Andy Murray
Australian Open: सानिया मिर्झा - राजीव रामचा मिश्र दुहेरीत सहज विजय

पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडलेल्या मरेने (Andy Murray) दुसऱ्या सेटमध्ये २ -० अशी आघाडी घेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तारोने पुन्हा मरेची सर्व्हिस ब्रेक करत २ - २ अशी बरोबरी केली. त्यानंतर तारोने दुसरा सेट देखील ६ - ४ फरकाने जिंकला. याचबरोबर तिसरा सेटही ६ - ४ असा जिंकत तारो डॅनियलने (Taro Daniel) तीन ग्रँडस्लॅम विजेत्या अँडी मरेचे ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान दुसऱ्या फेरीतच संपवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com