esakal | भारतीय वंशाच्या खेळाडूची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी
sakal

बोलून बातमी शोधा

australian team

भारतीय वंशाच्या खेळाडूची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी

sakal_logo
By
सुशांत जाधव

ऑस्ट्रेलिया संघाने (australian team) आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 23 सदस्यीय टीमची घोषणा केलीये. स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, जोश हेजलवूड, डेविड वॉर्नर, मोइसेस हेन्रिक्स, एलेक्स कॅरी आणि पॅट कमिन्स हे स्टार खेळाडू वेस्ट इंडिज दौऱ्यात पुन्हा संघात पदार्पण करणार आहेत. न्यूझीलंड विरुद्ध ते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले नव्हते. विशेष म्हणजे वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघात या स्टार खेळाडूंशिवाय आणखी एक नाव चर्चेत आले आहे. भारतीय वंशाचा तन्वीर संघ याला संघात स्थान मिळाले आहे. 9 जुलै रोजी 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेनं ऑस्ट्रेलिया संघ दौऱ्याला सुरुवात करणार आहे. (australian team announced for west indies tour Tanveer Sangha is only the second person of Indian origin to be selected Australian cricket team)

हेही वाचा: बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास!

तन्वीर संघा ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवणारा भारतीय वंशाचा दुसरा क्रिकेटर ठरलाय. यापूर्वी 2015 मध्ये गुरेंद्र संधू याला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले होते. न्यूझीलंड दौऱ्यावर गुरेंद्र संधू याची संघात वर्णी लागली. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला संधी मिळाली नव्हती.

ऑस्ट्रेलियन संघात मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉयनिस आणि मिशेल मार्श आणि डी आर्सी शॉर्ट यांना संधी देण्यात आलीये. जोश फिलिप याला देखील संघात स्थान देण्यात आले असून तो एलेक्स कॅरी आणि मॅथ्यू वेड यांचा बॅकअप विकेट किपर म्हणून संघासोबत असेल. अनुभवी ऑलराउंडर स्टोयनिस, मोइसेस हेनरिक्स आणि मार्श यांचा इन फॉर्म बॅट्समन मॅक्सवेलसोबत संघात स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा: बॉल टेम्परिंग प्रकरण; ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये पुन्हा वादळ

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी 23 वर्षीय ऑस्ट्रेलियन संघ

एरॉन फिंच (कर्णधार), एश्टन एगर, जेसन बेहरेनडॉर्फ, एलेक्स केरी, पैट कमिंस, जोश हेजलवुड, मोइसेस हेनरिक्स, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, तन्वीर संघ, डी'आर्सी शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोयनिस, मिशेल स्वेपसन, अँड्रयू टाय, मॅथ्यू वेड, डेविड वार्नर, एडम झम्पा.

असा आहे ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा

5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील सर्व सामने सेंट लूसिया आणि वनडे सीरीजमधील 3 सामने बारबाडोसच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. 9, 10, 12, 14 आणि 16 जुलै रोजी टी-20 सामने रंगणार असून 20, 22 आणि 24 जुलै रोजी वनडे सामने खेळवले जातील.