esakal | बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास!
sakal

बोलून बातमी शोधा

Barcelona

इंग्लंड महिला क्लबचा संघ सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत संघर्ष करताना दिसला.

बार्सिलोना महिला संघाने रचला इतिहास!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Women's Champions League : वूमन्स चॅम्पियन्स लीगच्या फायनलमध्ये बार्सिलोना संघाने चेल्साचा 4-0 असा धुव्वा उडवला. रविवारी रंगलेल्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करत बार्सिलोना महिला क्लबने पहिल्यांदा चॅम्पियन्स लीगचे जेतेपद पटकावले. संपूर्ण सामन्यात बार्सोलिना महिला संघातील खेळाडू आत्मविश्वासाने खेळताना दिसल्या. सुरुवातीपासून त्यांनी प्रतिस्पर्धी चेल्सा संघातील महिलांना बॅकफूटवर ठेवले. इंग्लंडचा क्लब सामन्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत संघर्ष करताना दिसला. दुसरीकडे विजेत्या बार्सोलोनाने कमालीचे पासिंग आणि मिळालेल्या संधीच गोलमध्ये रुपांतरित करत सर्वोत्तम खेळाचे दर्शन घडवून दिले.

हेही वाचा: धोनीनं केली जडेजाची कॉपी, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

सामन्याच्या सुरुवातीलाच लाइके मार्टन्सने मारलेला फटका गोलपोस्टला जाऊन परत आला. यावेळी फ्रॅन किर्बीने (Fran Kirby) चपळाईने चेंडू पुन्हा कव्हर केला. पहिल्याच मिनिटांत बार्सोलिनाच्या संघाने पहिला गोल नोंदवला. 14 व्या मिनिटात बार्सिलोनाने 2-0 अशी आघाडी भक्कम केली. पेनल्टीचा सुवर्ण वेध साधत अलेक्सिया पुटेल्लासने संघाला दुसरा गोल मिळवून दिला. चेल्सा संघातील फॉरवर्ड स्ट्राँग दिसला तरी डिफेन्समध्ये ढिलाई त्यांना चांगलीच महागात पडली. त्यांच्या डिफेन्सला यंदाच्या हंगामात केवळ पाच गोल डागता आले. हेच त्यांचे मोठे अपयश दाखवून देणारे होते.

2009 पासून ते आतापर्यंतच्या वूमन चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोना महिलांनी पहिल्यांदाच जेतेपद मिळवले आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवण्याचा विक्रम हा लिऑनला क्लबच्या नावे आहे. लिऑनला महिला संघाने (2011, 2012, 2016, 2017, 2018, 2019 आणि 2020) तब्बल सातवेळा चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे. आयनट्राच फ्रँकफर्टने चारवेळा जेतेपद पटकावले आहे. चेल्सा आणि बार्सिलोना दोन्ही संघ आपल्या पहिल्या वहिल्या वूमन्स चॅम्पियन्स लीग टायटल मिळवण्यासाठी मैदानात उतरले होते. अखेर बार्सिलोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत निर्विवाद वर्चस्व राखत सामन्यासह पहिल्यांदा ऐतिहासिक विजयाची नोंद केली.