Avinash Sable: अविनाश साबळे जागतिक स्पर्धेला मुकणार; मुंबईत गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया, तंदुरुस्तीसाठी काही काळ लागणार
Avinash Sable knee surgery update 2025: तीन हजार मीटर स्टीपलचेसचा राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळेला गुडघ्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यामुळे तो जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
नवी दिल्ली : तीन हजार मीटर स्टीपलचेसमधील राष्ट्रीय विक्रमवीर अविनाश साबळेला गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेला मुकावे लागणार आहे. यंदा तो सहभागी झाला असता तर त्याचा हा जागतिक स्पर्धेतील चौथा सहभाग असता.