
Axar Patel ने मोडला धोनीचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड
IND vs WI : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने अप्रतिम कामगिरी केली. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात संपूर्ण थरार पाहायला मिळाला. वेस्ट इंडिजचा संघ पाहतच राहिला आणि भारताने हरलेला सामना जिंकला. अक्षर पटेल टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला, सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने अवघ्या 35 चेंडूत 64 धावा केल्या. त्याने या मॅचमध्ये एमएस धोनीचा 17 वर्ष जुना विक्रमही मोडला, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
हेही वाचा: Axar Patel ने धोनीसारखा षटकार मारत जिंकली मालिका; विजयानंतर म्हणाला...
अक्षर पटेल या सामन्यात 7व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मॅच विनिंग इनिंग खेळला. या इनिंगमध्ये त्याच्या बॅटने पाच विस्फोटक षटकार मारताना दिसले. अक्षर पटेल यासह सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. एवढेच नाही तर भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या 3 चेंडूत 6 धावांची गरज होती. अक्षर पटेलने ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा: VIDEO: टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये इशान किशनची धुलाई, शिखरची पोस्ट व्हायरल
एमएस धोनीने 2005 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 3 षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता. एमएस धोनीच्या या विक्रमाची स्फोटक फलंदाज युसूफ पठाणने दोनदा बरोबरी केली आहे. आफ्रिका आणि आयर्लंडविरुद्ध धावांचा पाठलाग करताना युसूफ पठाणने हा पराक्रम केला. अक्षर पटेलने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना त्याने 9 षटकात केवळ 40 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतला. फलंदाजी करताना त्याने 182.85 च्या स्ट्राईक रेटने 35 चेंडूत नाबाद 64 धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 5 षटकार मारले.
Web Title: Axar Patel Break Ms Dhoni 17 Year Old Record Of Most Sixes In Successful Run Chase Ind Vs Wi Sports Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..