VIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला 'लकी' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Axar Patel Direct Hit Glenn Maxwell Unlucky Runout

VIDEO| Axar Patel : अक्षरची थेट फेकी, कार्तिक ठरला 'लकी'

Axer Patel IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्यात दमदार सुरूवातीनंतर कांगारूंचा संघ ढेपाळला. कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर आक्रमक वृत्तीच्या ग्लॅन मॅक्सवेलकडून अपेक्षा होत्या. मात्र अक्षर पटेलची थेट फेकी दिनेश कार्तिकसाठी लकी ठरली आणि मॅक्सवेल 11 चेंडूत 6 धावा करून माघारी फिरला. विशेष म्हणजे विकेटकिपर दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) चेंडू पकडण्याआधीच बेल्स पालडी होती. मात्र तरी देखील रिप्लेमध्ये तिसऱ्या पंचांनी मॅक्सवेलला बाद केले. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. (Axar Patel Direct Hit Glenn Maxwell Unlucky Runout)

हेही वाचा: IND vs AUS 3rd T20I Live : कांगारूंचा निम्मा संघ माघारी

20 चेंडूत 52 धावांची धडाकेबाज खेळी करणारा कॅमेरून ग्रीन बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलवर ऑस्ट्रेलियाची धावगती कायम राखण्याची जबाबदारी होती. मात्र मॅक्सवेल 11 चेंडूत 6 धावा करून धावबाद झाला. तो विचित्र पद्धतीने धावबाद झाल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. युझवेंद्र चहलच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलने दोन चोरट्या धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या अक्षर पटेलने थेट स्टम्पच्या दिशेने थ्रो केला. मात्र चेंडू दिनेश कार्तिकच्या ग्लोजमध्ये येण्याआधीच कार्तिकने एक बेल्स पाडली होती. अशा परिस्थितीत मॅक्सवेल क्रीजच्या बाहेर असूनही धावबाद झाला नसता.

मात्र ज्यावेळी दिनेश कार्तिकच्या ग्लोजमुळे पहिली बेल्स पडली होती त्यावेळी दुसरी बेल्स अजून विकेटवरच होती. विशेष म्हणजे अक्षर पटेलचा थ्रो या बेल्सवच जावून आदळला. त्यावेळी मॅक्सवेल क्रीजच्या बाहेर होता. त्यामुळे पंचांनी त्याला बाद दिले. नियमानुसार जर चेंडू स्टम्पला लागण्यापूर्वीच एक बेल्स पडली असेल त्यावेळी धावबाद करण्यासाठी दुसरी बेल्स उडवणे गरजचे असते. अक्षरच्या फरफेक्ट थ्रोन हेच साध्य केले आणि मॅक्सवेल खाली मान घालून पॅव्हेलियनमध्ये परतला.

हेही वाचा: Kuldeep Yadav : कुलदीपने हॅट्ट्रिक करत संघ व्यवस्थापनला दिले चोख प्रत्युत्तर

ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना धडाकेबाज सुरूवात केली. कांगारूंनी 3 षटकात 40 धावा चोपल्या. मात्र त्यानंतर फिंच बाद झाला. दरम्यान सलामीवीर कॅमेरून ग्रीनने 19 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 5 षटकात 62 धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र भुवनेश्वर कुमारने त्याला 52 धावांवर बाद केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची धावगती मंदावली. मॅक्सवेल 6 तर स्मिथ 9 धावा करून स्वस्तात माघारी गेले.