Axar Patel IND vs AUS : ये तो धोती खोल रहा है... अक्षर पटेलच्या प्रतिक्रियेवर हास्यकल्लोळ

Axar Patel Nagpur Test Pitch Reaction
Axar Patel Nagpur Test Pitch Reactionesakal

Axar Patel Nagpur Test Pitch Reaction : भारताने नागपूर कसोटीत पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा ठोकल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला भारतीय खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करायची याचा वस्तूपाठच घालून दिला. भारताकडून कर्णधार राहित शर्माने सर्वाधिक 120 धावा केल्या तर अष्टपैलू अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.

Axar Patel Nagpur Test Pitch Reaction
IND vs AUS 1st Test Day 3 Live: अश्विन जडेजाने कांगारूंना दिले धक्के; कांगारूंची टॉप ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये

दरम्यान, भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल दुसऱ्या दिवशी 52 धावांवर नाबाद होता त्यावेळी त्याने समालोचकांनी त्याला खेळपट्टीबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी अक्षर पटेलने एकदम ढासू उत्तर दिले. या उत्तरावरच सध्या सोशल मीडियावर तुफान मीमबाजी सुरू आहे.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अक्षर पटेल म्हणाला की, 'मी गेल्या वर्षभरापासून फलंदाजीत चांगली कामगिरी करतोय. हा आत्मविश्वास आज कामी आला. मला माझे फलंदाजीचे तंत्र चांगले आहे हे माहिती होते. मी ब्रेकवर असताना त्यावर काम केले आहे. मी प्रशिक्षकांसोबत यावर काम केले. त्यांनी मला तुझ्यात क्षमता आहे तू योगदान दिलं पाहिजेस असं सांगितलं होते.'

अक्षरला ज्यावेळी खेळपट्टीबाबत विचारण्यात आले त्यावेळी त्याने मजेदार उत्तर दिले. तो म्हणाला, 'आम्ही उद्या जोपर्यंत फलंदाजी करतोय तोपर्यंत खेळपट्टी चांगली असेल. ज्यावेळी आम्ही गोलंदाजीला सुरूवात करू खेळपट्टी आम्हा गोलंदाजांना साथ द्यायला लागेल.' या प्रतिक्रियेनंतर अक्षरही हसायला लागला.

Axar Patel Nagpur Test Pitch Reaction
IND vs AUS: पूर्वपुण्याई दुसरं काय! राहुलला पुढच्या सामन्यात खेळण्याबाबत कोचने केला मोठा खुलासा

अक्षरच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com