
पुणे : पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटनेच्या वतीने उद्यापासून (ता. ९) सुरू होणाऱ्या ७५व्या ज्युनियर (अठरा वर्षांखालील) गटाच्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याच्या मुले व मुलींच्या संघाचे नेतृत्व अनुक्रमे आयुष जवळकर आणि अक्षया पाटीलकडे सोपविण्यात आले आहे.