BWF World Championships: गतविजेत्याला आयुषचा धक्का; जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन

Ayush Shetty Stuns Defending Champion Shi Yuqi: भारताच्या युवा आयुष शेट्टीने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटनच्या सलामीच्या लढतीत गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू शी यू की याला २१-१४, १३-२१, २१-१९ असे नमवत मोठा उलटफेर केला. पी. व्ही. सिंधूसह भारतीय खेळाडूंचीही विजयी सुरुवात झाली.
BWF World Championships

BWF World Championships

esakal

Updated on

नवी दिल्ली: भारताचा युवा खेळाडू आयुष शेट्टी याने जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील सलामीच्याच लढतीत खळबळ उडवली. त्याने या स्पर्धेचा गतविजेता व अव्वल मानांकित चीनच्या शी यू की याच्यावर तीन गेममध्ये रोमहर्षक विजय मिळवत पुढल्या फेरीमध्ये प्रवेश केला. भारतीय खेळाडूने एक तास व तेरा मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये पाच वेळची पदकविजेती पी. व्ही. सिंधू हिनेही प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय संपादन करीत वाटचाल केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com