
Babar Azam : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या मॉडर्न क्रिकेट युगातील सर्वोकृष्ट फलंदाजांपैकी एक फलंदाज म्हणून गणला जातो. बाबर सध्या आयसीसीच्या वनडे आणि टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर कसोटीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे आयसीसीच्या तीनही क्रिकेट फॉरमॅटच्या रँकिंगमध्ये अव्वल तीन स्थानावर असणारा तो एकमेव फलंदाज आहे. (Babar Azam Asked Journalist Is He Getting Old After Giving Up One Cricket Format Question)
नुकतेच श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचा बाबर आझम इंग्लंडच्या जो रूटला कसोटी रँकिंमधील अव्वल स्थानावरून खाली खेचेल असे वक्तव्य केले होते. त्यावेळी बाबर आझमकडे नैसर्गिक गुणवत्ता आहे. तो कोणत्याही परिस्थिती धावा करू शकतो. तो परिस्थितीशी लगेच जुळवून घेतो. असे म्हणत जयवर्धनेने बाबरचे गुणगान केले होते.
मात्र नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बाबर आझमला पराभवाबद्दल विचारणा झाली. त्यावेळी त्याला पत्रकाराने तो स्वतः, मोहम्मद रिझवान आणि शाहीन शाह अफ्रिदी यांना एक क्रिकेट फॉरमॅटमध्ये खेळणे बंद करणे गरजेचे आहे का असे विचारले.
या प्रश्नावर बाबर आझमने 'हे तुमच्या फिटनेसवर अवलंबून आहे. आता ज्या प्रकारे आमचा फिटनेस आहे त्यावरून आता तरी वाटत नाही की आम्ही दोनच क्रिकेट फॉरमॅट खेळावेत. तुम्हाला काय वाटतं मी म्हातारा झालो आहे का? की आम्ही सर्व म्हातारे झालो आहोत?'
यावर पत्रकाराने उत्तर दिले की, 'तुमच्यावर तीन क्रिकेट फॉरमॅटचा ताण तर येत आहे ना.' त्यावर बाबर म्हणाला की, 'मला असे वाटत नाही. जर ताण जास्त असेल तर त्या प्रमाणे फिटनेस वाढवला जाईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.