Arjun Tendulkar : अर्जुन मुंबईला ठोकणार राम राम, आता होणार गोवेकर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arjun Tendulkar News

Arjun Tendulkar : अर्जुन मुंबईला ठोकणार राम राम, आता होणार गोवेकर!

Arjun Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबईला (Mumbai) राम राम ठोकणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील पुढचा हंगाम हा गोव्याकडून (Goa) खेळणार आहे. 22 वर्षाच्या डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्स संघात होता. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील टी 20 स्पर्धा सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दोन सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्याने हरियाणा आणि पाँडेचेरी विरूद्ध खेळला होता. आता मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन तेंडुलकरने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (Mumbai Cricket Association) ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मागितले आहे.

हेही वाचा: IPL वाद! सुनिल गावसकरांनी ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टला फटकारले

एसआरटी स्पोर्ट्स मॅनेजमेंटने 'अर्जुन तेंडुलकरच्या कारकिर्दिसाठी जास्तीजास्त सामने खेळणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्हाला असे वाटते की अर्जुन तेंडुलकरने दुसऱ्या राज्याकडून खेळ गरजेचे आहे कारण त्याला जास्तीजास्त स्पर्धात्मक सामने खेळायला मिळतील.' असे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे.

हेही वाचा: Laal Singh Chaddha : चित्रपट पाहिल्यावर विरेंद्र सेहवाग, सुरेश रैना म्हणाले...

अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षाखालील भारतीय संघाकडून श्रीलंकेविरूद्ध दोन कसोटी सामने देखील खेळले आहेत. त्यानंतर त्याने मुंबईच्या संघात स्थान मिळवले. मात्र त्याला एकही सामना न खेळवता संघातून वगळण्यात आले. त्यामुळे त्याला आपली गुणवत्ता दाखवून देण्याची पुरेशी संधी मिळाली नाही. दरम्यान, अर्जुन तेंडुलकरला मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना वाटके ती या युवा गोलंदाजाकडे चांगला दृष्टीकोण आणि वर्क इथिक्स आहेत. त्याला फक्त जास्तीजास्त सामने खेळण्याची संधी मिळण्याची गरज आहे.

अर्जुन तेंडलुकर सध्या मुंबई इंडियन्सच्या युवा संघासोबत इंग्लंडमध्ये टी 20 सामने खेळत आहे. त्याच्या सोबत कुमार कार्तिकेय, अमोलप्रीत सिंग, रमनदीप सिंग, डेवाल्ड ब्रेविस देखील आहेत. दरम्यान अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून खेळणार या वृत्ताला गोवा क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

हेही वाचा: Will Smeed : विल स्मीडने 'द हंड्रेड' स्पर्धेत ठोकले पहिले शतक; रचला इतिहास

गोवा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुरज लोटलिकर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'आम्हाला डावखुरा वेगवान गोलंदाज हवा होता. हा डावखुरा गोलंदाज मधल्या फळीत फलंदाजीतही आपले योगदान देईल. या पार्श्वभूमीवर आम्ही अर्जुन तेंडुलकरला गोव्याच्या संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आम्ही हंगामापूर्वी मर्यादित षटकांचे काही चाचणी सामने खेळवणार आहोत. अर्जुन हे सामने खेळेल. त्यानंतर निवड समिती त्याची कामगिरी पाहून त्यावर निर्णय घेतील.'

Web Title: Arjun Tendulkar Seeks Noc From Mumbai Likely To Play Goa

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..