Babar Azam : क्रेडिट हमारा है! बाबरचा ड्रेसिंग रूम मधील 'तो' व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam

Babar Azam : क्रेडिट हमारा है! बाबरचा ड्रेसिंग रूम मधील 'तो' व्हिडिओ व्हायरल

Babar Azam Pakistan in T20 WC : पाकिस्तान संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात यशस्वी झाला आहे. आफ्रिकेचा नेदरलँडकडून झालेला पराभव आणि पाकिस्तानसाठी तो सर्वाधिक फायदेशीर ठरला. जर दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला असता तर बांगलादेशकडून जिंकूनही पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोहोचला नसता. उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने आपल्या खेळाडू सोबत बोलताना दिसला.

हेही वाचा: Rohit Sharma Fan : रोहितच्या जबरा फॅनला मैदानातील घुसखोरी पडली लाखात, पोलिसांनी...

बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर बाबरने आपल्या खेळाडू सोबत बोलत होता. व्हिडिओ सुरू होताच बाबर म्हणातो, नक्की क्रेडिट आपलं आहे. आपण आपले 100 टक्के प्रयत्न केले आहेत. आपण संघ म्हणून ज्या पद्धतीने शेवटचे दोन सामने खेळलो, त्याप्रमाणे आम्हाला तिथे पुढे जायचे आहे. संघाचा फलंदाज मोहम्मद हॅरिसचे कौतुक करताना बाबर म्हणाला, विशेषतः हॅरी ज्या प्रकारे तु खेळलात. जेव्हा सामना हातात असेल तेव्हा विकेट गमावू नका आणि आज तु या गोष्टीतून गेला. आम्हाला वरिष्ठांकडूनही सांगितले की, तुम्ही फिनिशिंग पूर्ण केल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढेल. मग पुढच्या सामन्यात तुम्ही वेगळ्या पद्धतीने खेळाल. कारण त्यानंतर तुझी आत्मविश्वास पातळी वेगळी असेल. याशिवाय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली.

मॅचमध्ये काय घडलं ?

पाकिस्तान संघाने बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केला. अॅडलेडमध्ये पाकिस्तानने 18.1 षटकांत 5 गडी गमावून 128 धावांचे लक्ष्य पार केले. पाकिस्तानच्या या विजयाचा हिरो ठरला शाहीन आफ्रिदी ज्याने चार षटकात 22 धावा देत चार बळी घेतले.