Babar Azam: रिपोर्टर ओरडल्यावर बाबरने डोळे वटारून दिली प्रतिक्रिया; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam On Pakistani Journalist

Babar Azam: रिपोर्टर ओरडल्यावर बाबरने डोळे वटारून दिली प्रतिक्रिया; व्हिडिओ व्हायरल

Babar Azam On Pakistani Journalist : कराचीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेदरम्यान पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम एका पत्रकाराच्या वागण्यावर नाराज दिसला. पत्रकार परिषदेत तो प्रश्नांना उत्तरे देत होते. अशा परिस्थितीत पत्रकाराला प्रश्न विचारण्याची संधी मिळाली नाही. ज्याने नंतर बाबरवर राग काढण्याचा प्रयत्न केला. पत्रकाराची ही वृत्ती पाहून पाकिस्तानच्या कर्णधाराने नाराजी व्यक्त केली. आणि डोळे वटारून प्रतिक्रिया दिली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा: Team India: चषकांचा दुष्काळ, नेतृत्व बदल अन् दुखापतग्रस्त खेळाडू; असे होते टीम इंडियासाठीचे 2022चे वर्ष

पत्रकार परिषद संपल्यानंतर बाबर आझम बाहेर जात होत इतक्यात एका पत्रकार त्याला म्हणाला, बाबर हा मार्ग नाही. येथे आम्ही तुला प्रश्न विचारण्यास आलो आहोत. यानंतर बाबर आझमने त्या पत्रकाराकडे पाहिले. कर्णधाराच्या लूकवरून असे वाटत होते की तो पत्रकाराच्या वृत्तीवर चिडलेला आणि खूश नाही. यानंतर रुममध्ये उपस्थित मीडिया मॅनेजरने लगेचच मायक्रोफोन बंद केला.

हेही वाचा: Rishabh Pant: "फक्त ५-६ सेकंद उशीर झाला असता तर पंत आज आपल्यात..." ड्रायव्हरने सांगितली सगळी कहाणी

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे खेळण्यात आलेला दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पाकिस्तानने पहिल्या डावात 438 आणि दुसऱ्या डावात 8 गडी बाद 311 धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडने पहिला डाव 9 विकेट्सवर 612 धावा करून घोषित केला. अशाप्रकारे पाकिस्तानने पाहुण्यांना जिंकण्यासाठी 138 धावांचे लक्ष्य दिले. दुसऱ्या डावात लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने 1 बाद 61 धावा केल्या. पण खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. अशा प्रकारे कराची कसोटी अनिर्णित राहिली. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर 2 जानेवारीपासून खेळला जाणार आहे.