Rishabh Pant: "फक्त ५-६ सेकंद उशीर झाला असता तर पंत आज आपल्यात..." ड्रायव्हरने सांगितली सगळी कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishabh Pant Car Accident

Rishabh Pant: "फक्त ५-६ सेकंद उशीर झाला असता तर पंत आज आपल्यात..." ड्रायव्हरने सांगितली सगळी कहाणी

Rishabh Pant Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंत एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावला आहे. शुक्रवारी ३० डिसेंबरला पहाटे पंतच्या कारचा रुरकीजवळ अपघात झाला. त्यावेळी बसचा चालक सुशील कुमार आणि कंडक्टर परमजीत तेथे आले. त्यांनीच पंतला वाचवले आणि रुग्णवाहिका बोलावून रुग्णालयात पाठवले. या प्रशंसनीय कामासाठी या दोघांनाही मोठा पुरस्कार मिळाला आहे.

सुशील कुमार आणि परमजीतचा पानिपत डेपोने गौरव केला आहे. उत्तराखंड सरकारनेही या दोन्ही लोकांचा सन्मान करणार असल्याचे जाहीर केले आहे. दोघांनी मानवतेसाठी प्रशंसनीय काम केल्याचे सरकारने म्हटले.

हेही वाचा: Rishabh Pant : पंत IPL 2023 मधून बाहेर? हा खेळाडू दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाचा दावेदार

बस कंडक्टर परमजीत अपघातानंतर म्हणाला की, एक व्यक्ती खिडकीमधून अर्थवट बाहेर आलेल्या अवस्थेत होता. आम्ही त्याला बाहेर काढताच, 5-7 सेकंदानंतर कारला आग लागली आणि कार जळून खाक झाली. त्याच्या पाठीला खूप जखम झाली होती. यानंतर आम्ही त्याला विचारले की तो कोण आहे, तेव्हा त्याने सांगितले मी क्रिकेटपटू ऋषभ पंत आहे. मी कधी क्रिकेट पाहत नाही, ऋषभ पंत कोण आहे हे मला माहिती नव्हते. मात्र माझ्या बसमधील इतर लोकांनी ऋषभ पंतला ओळखलं. या विधानावरून हे स्पष्ट होते की 5-7 सेकंद उशीर झाला असता तर काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती.

हेही वाचा: Rishabh Pant Accident: पंतची प्लास्टिक सर्जरी, डोके अन् मणक्याचा MRI आला समोर... जाणून घ्या अपडेट

ऋषभ पंतचा हा अपघात रुरकीजवळील गुरुकुल नरसन परिसरात झाला. पंत स्वतः कार चालवत होता. अपघातानंतर पंत म्हणाले होते की, गाडी चालवताना त्यांना झोप लागली आणि कार डिव्हायडरला धडकली आणि अपघात झाला. गाडीची काच फोडत तो बाहेर आला. यानंतर गाडीला भीषण आग लागली.

सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले. ज्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे. रिपोर्ट नॉर्मल आला आहे.