Asia Cup 2023 : धावा 14 विकेट 5! सुरूवातीला यजमानांना दिला त्रास मात्र पाकिस्ताननं छोट्या नेपाळला लोळवलं

Asia Cup 2023 PAK vs NEP
Asia Cup 2023 PAK vs NEPESAKAL

PAK vs NEP Asia Cup 2023 : आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा 238 धावांनी पराभव करत धडाक्यात सुरूवात केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने 50 षटकात 6 बाद 342 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रत्युत्तरात आशिया कपमध्ये आपला पहिला वहिला सामना खेळणाऱ्या नेपाळचा संपूर्ण संघ 104 धावात गारद झाला. नेपाळचे शेवटचे 5 फलंदाज तर अवघ्या 14 धावात पॅव्हेलियनमध्ये पोहचले.

पाकिस्तानकडून शादाब खानने 4 तर शाहीन आफ्रिदी आणि हारिस रौऊफने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. नेपाळकडून फक्त 2 फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला. प्रथम फलंदाजी करतना पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 151 धावांची तर इफ्तिकार अहमदने नाबाद 109 धावांची शतकी खेळी केली.

पाकिस्तानच्या 342 धावांच्या आव्हनाचा पाठलाग करताना नेपाळला पहिल्याच षटकात दोन धक्के बसले होते. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर दुसऱ्याच षटकात नसीम शाहने आसिफ शेखला 5 धावावर बाद करत नेपाळची अवस्था 2 षटकात 3 बाद 14 धावा अशी केली होती.

नेपाळचा डाव शंभरच्या आत गुंडाळला जाईल असे वाटत असतानाच आरिफ शेख आणि सोमपाल कामी यांनी 59 धावांची भागीदारी रचत पाकिस्तानच्या गोलंदाजांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला.

मात्र हारिस रौऊफने ही जोडी फोडली. त्याने आरिफ शेखला 26 धावांवर बाद केले. पाठोपाठ 28 धावा करणाऱ्या सोमपालचा देखील अडसर दूर केला. यानंतर शादाब खानने नेपाळचे शेपूट स्वस्तात गुंडाळण्याचे काम केले. त्याने 27 धावात 4 बळी घेत नेपाळचा डाव 104 धावात गुंडाळला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com