

Babar Azam
esakal
Babar Azam Responds to Format Questions: पाकिस्तानच्या स्टार खेळाडूंमधील एक असलेला बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत पेशावर झल्मीला २०२६ मध्ये विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यानंतर बाबरला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे सध्या त्याची चर्चा आहे. त्याला विचारण्यात आले होते की तू आता एकाच फॉरमॅटकडे लक्ष देणार आहेस का? यावर बाबर आझमने मध्येच थांबून उत्तर दिलं की काळजी करू नका, मी आता तिन्ही फॉरमॅट खेळणार आहे. अंतिम सामन्यात बाबर आझम पहिल्या चेंडूवर बाद झाला असला तरी त्याने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली.