Imran Khan : इम्रान खान यांच्यावरील गोळीबारावर बाबरचे ट्विट, म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babar Azam Tweeted After Firing On Imran Khan

Imran Khan : इम्रान खान यांच्यावरील गोळीबारावर बाबरचे ट्विट, म्हणाला...

Babar Azam Tweeted After Firing On Imran Khan : आज (दि. 03) पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांच्यावर पब्लिक रॅलीदरम्यान गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात इम्रान खान जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे देखील वृत्त येत आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामना खेळत असलेल्या कर्णधार बाबर आझमला हे वृत्त समजताच त्याने सामन्यानंतर इम्रान खान यांच्याासाठी ट्विट केले.

हेही वाचा: Imran Khan पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जीवघेणा हल्ला; गोळीबारात जखमी

पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांची पराभव केला. या विजयाबरोबरच पाकिस्तानने आपले वर्ल्डकपमधील आव्हान कायम ठेवले आहे. हा सामना सुरू असतानाच पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान पब्लिक रॅली करत होते. याचवेळी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचा सध्याचा कर्णधार बाबर आझमने ट्विट करून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. त्याने ट्विट केले की, 'या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध इम्रान खान अल्लाह आपल्याला सुरक्षित ठेवो आणि पाकिस्तानचे संरक्षण करो.'

हेही वाचा: Mohammad Nawaz : एकाच चेंडूवर दोनवेळा बाद झाला नवाझ; नियम माहिती असता तर वाचला असता

या हल्ल्यात इम्रान हे जखमी झाले असून त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. इम्रान खान सध्या रुग्णालयाता दाखल करण्यात आले आहे. हा गोळीबार कुणी केला, हल्लेखोर कोण होते, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पण याविषयी तपास यंत्रणा सतर्क झाली आहे. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

इम्रान खान हे ओपन जीपमधून रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पण गोळीबारानंतर त्यांना बुलेटप्रुफ वाहनातून पुढे रुग्णालयात नेण्यात आल्याचं या रॅलीच्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसतंय.