Video : बेबी एबीकडून 500 च्या स्ट्राईक रेटने धुलाई; 0,6,6,6,6,6 अजून काय पाहिजे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Baby AB Dewald Brevis CPL 2022 Batting Video Gone Viral

Video : बेबी एबीकडून 500 च्या स्ट्राईक रेटने धुलाई; 0,6,6,6,6,6 अजून काय पाहिजे?

Dewald Brevis CPL 2022 : दक्षिण आफ्रिकेचा बेबी एबी अर्थात एबी डिव्हिलियर्सशी तुलना होणाऱ्या डेवाल्ड ब्रेविसने कॅरेबियन प्रीमियर लीग 2022 (CPL 2022) मध्ये धमाका केला. सीपीएलचा 26 वा सामना सेंट किंट्स अँड नेविस पॅट्रॉईट्स आणि त्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात ब्रेविसने फक्त 6 चेंडूच खेळले. या सहा चेंडूत पहिला निर्धाव गेलेला चेंडू सोडला तर पुढच्या सगळ्या चेंडूवर ब्रेविसने चेंडू सीमापार टोलवला. त्याने 6 चेंडूत 500 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा कुटल्या.

हेही वाचा: Video : सचिन तेंडुलकरने वयाच्या 49 व्या वर्षीही खेळली तुफानी पारी

सीपीएलच्या 26 व्या सामन्यात ब्रेविस सेंट किंट्स अँड नेविस पॅट्रॉईट्स कडून खेळत होता. सेंट किट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या. यात शेरफेन रदरफोर्डने 50 चेंडूत 78 धावांची खेळी केली. मात्र सामन्याची लाईम लाईट तर डेवाल्ड ब्रेविसवरच राहिली.

ब्रेविस 18 व्या षटकात फलंदाजी करण्यात आला. पहिलाच चेंडू निर्धाव गेला. 18 व्या षटकात त्याला फक्त एकच चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर 19 व्या षटकात ब्रेविसला स्पिनर अकील हुसैनची गोलंदाजी खेळण्याची संधी मिळाली. 19 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बेबी एबीने षटकार मारून वादळ येणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर षटकाच्या पुढच्या 2 चेंडूवर देखील ब्रेविसने दोन षटकार मारले.

हेही वाचा: IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुर मधला सामना कुठे 'फ्री' पाहायचा

ब्रेविसला 20 व्या षटकात स्ट्राईक मिळण्यासाठी थोडी वाट पहावी लागली. त्याला षटकाचे शेवटचे दोन चेंडू खेळण्याची संधी मिळाली. त्याने या दोन्ही चेंडूवर दोन षटकार मारत स्टाईलमध्ये डाव संपवला. ब्रेविसने आपल्या या छोटेखानी खेळीत फक्त 6 चेंडूंचा सामना केला. यातील 5 चेंडूवर त्याने 5 षटकार मारत 30 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 500 होता.

ब्रेविसच्या या आक्रमक खेळीच्या जोरावर सेंट किंट्स अँड नेविस पॅट्रॉईट्सने 20 षटकात 6 बाद 163 धावा उभारल्या. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या त्रिनबागो नाईट रायडर्सला 20 षटकात 7 बाद 156 धावाच करता आल्या. सेंट किट्सने हा सामना 7 धावांनी जिंकला.

Web Title: Baby Ab Dewald Brevis Cpl 2022 Batting Video Gone Viral Hit 5 Sixes In 6 Balls Scored 30 With 500 Strike Rate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..