Video : सचिन तेंडुलकरने वयाच्या 49 व्या वर्षीही खेळली तुफानी पारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sachin Tendulkar India Legends

Video : सचिन तेंडुलकरने वयाच्या 49 व्या वर्षीही खेळली तुफानी पारी

Sachin Tendulkar India Legends : सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया लेजेंड्सने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज मॅचमध्ये इंग्लंड लिजेंड्सचा 40 धावांनी पराभव केला. डेहराडूनमध्ये पावसाचा व्यत्यय हा सामना 15-15 षटकांचा करण्यात आला. सचिन तेंडुलकरच्या संघाने 15 षटकांत पाच गडी गमावून 170 धावा केल्या. यानंतर इंग्लंड लीजेंड्स संघाला सहा विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या.

हेही वाचा: IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपुर मधला सामना कुठे 'फ्री' पाहायचा

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या या 14 व्या सामन्यात इंडिया लीजेंड्सची कामगिरी पाहण्यासारखी होती. सचिनने तुफानी खेळी खेळत 20 चेंडूवर 40 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि अनेक षटकार ठोकले. त्याच वेळी युवराज सिंगने 15 चेंडूवर नाबाद 31 चे योगदान दिले त्यात एक चौकार आणि तीन षटकार होते. स्टीफन पॅरीने इंग्लंडच्या दिग्गज संघासाठी तीन विकेट घेतले.

हेही वाचा: Babar-Virat : बाबर आझमने पुन्हा विराट कोहलीला टाकले मागे, रिझवानसोबत रचला इतिहास

डेहराडूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने धमाकेदार सुरुवात करत 5.3 षटकात 65 धावा केल्या. सचिन आणि यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ओझाला पॅरीने बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. सचिन आणि युवीशिवाय युसूफ पठाणनेही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्याने 11 चेंडूत 1 चौकार आणि तीन षटकारांसह 27 धावा केल्या. भारताने निर्धारित 15 षटकांत 5 गडी गमावून 170 धावा केल्या.

हेही वाचा: IND vs AUS : रोहितने मैदानातच का धरला कार्तिकचा गळा; सूर्यकुमार यादवने केला खुलासा

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 15 षटकांत 6 गडी गमावून केवळ 130 धावा करू शकला. यादरम्यान फिल मस्टर्डने सर्वाधिक 29 धावांची खेळी खेळली, तर राजेश पवारने तीन षटकांत 12 धावा देत भारताकडून सर्वाधिक तीन बळी घेतले. या विजयासह भारत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये भारत, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका हे तीन संघ आहेत ज्यांना अद्याप पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Web Title: India Legends Beat England Legends Road Safety World Series Sachin Tendulkar Sports Cricket

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..