Badminton Asia Championships : भारताला ५८ वर्षांनंतर ऐतिहासिक सुवर्णपदक

चिराग शेट्टी - सात्विक रेड्डी आशियाई विजेते
Badminton
Badminton sakal

दुबई : गेल्या वर्षी जागतिक, राष्ट्रकुल, थॉमस करंडक या प्रतिष्ठेच्या स्पर्धांसह दोन वर्ल्ड टूअर स्पर्धांची अजिंक्यपदे पटकावणाऱ्या सात्विक साईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी या भारतीय जोडीने रविवारी इतिहास रचला. सात्विक - चिराग जोडीने ओंग सिन - टिओ ई या मलेशियन जोडीवर पहिला गेम पराभूत झाल्यानंतरही पुढील दोन गेममध्ये विजय मिळवत आशियाई बॅडमिंटन ही मानाची स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला.

भारताला तब्बल ५८ वर्षांनंतर या स्पर्धेच्या सुवर्णपदकावर नाव कोरता आले. दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये पुरुष एकेरी गटामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर सात्विक - चिराग जोडीने पुरुष दुहेरीत भारताला सुवर्णपदक जिंकून दिले आहे.

सात्विक - चिराग आणि ओंग सिन - टिओ ई यांच्यामधील पहिल्या गेममध्ये कमालीची चुरस दिसून आली. दोन्ही जोड्यांमध्ये ११-११ अशी बरोबरी झाली. त्यानंतर पहिला गेम २१-१६ असा जिंकण्यात मलेशियन जोडीला यश लाभले.

दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने ६-२ अशी आघाडी घेत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर भारतीय जोडीने मलेशियन जोडीशी बरोबरी करण्यात यश मिळवले. त्यामुळे १४-१४ अशी बरोबरी झाली. यानंतर सात्विक - चिराग जोडीने मागे वळून बघितले नाही. अखेर हा गेम २१-१७ असा जिंकण्यात भारतीयांना यश मिळाले. तिसऱ्या गेममध्येही मलेशियन जोडीकडे ११-८ अशी आघाडी होती. पण सात्विक - चिराग जोडीने सर्वस्व पणाला लावत खेळ केला व हा गेम २१-१९ असा खिशात टाकला. २० लाखांचे बक्षीस भारतीय बॅडमिंटन संघटनेकडूनही भारतीय खेळाडूंना २० लाख रुपये बक्षिसाच्या रूपात देण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com