Badminton WC2023 : सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिपमधून बाहेर! भारताच्या लक्ष्य, प्रणॉयची आगेकूच

Badminton WC2023
Badminton WC2023

Badminton World Championships 2023 : भारतासाठी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील मंगळवारचा दिवस संमिश्र यशाचा ठरला. एकीकडे लक्ष्य सेन व एच.एस.प्रणॉय या खेळाडूंनी पुरुषांच्या एकेरीत आगेकूच केली असतानाच ऑलिंपिक पदकविजेती पी.व्ही.सिंधू हिला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील तिचे आव्हान संपुष्टात आले.

Heath Streak Passed Away : दिग्गज क्रिकेटपटू अन् माजी कर्णधाराचे निधन, 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या स्पर्धेमध्ये लक्ष्य याला ११वे मानांकन देण्यात आले आहे. तसेच २०२१मध्ये त्याने या स्पर्धेत ब्राँझपदकाला गवसणी घातली होती. त्याच्यासमोर ५१व्या स्थानावरील कोरियाच्या जिऑन जिन याचे आव्हान होते. भारताच्या पठ्ठ्याने कोरियन खेळाडूवर २१-११, २१-१२ असा सहज विजय संपादन केला. लक्ष्यने ३६व्या मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर मात केली हे विशेष.

Badminton WC2023
World Archery Championship: आदिती स्वामीची ऐतिहासिक कामगिरी! भारतानं पहिल्यांदाच जिंकल 'गोल्ड'

प्रणॉय याने चिको वारदोयो याच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारत पुढे पाऊल टाकले. प्रणॉयने पहिला गेम २१-९ असा खिशात टाकला. पहिल्या गेममध्ये प्रणॉयने अप्रतिम खेळ करीत आघाडी मिळवली. दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्ध्याकडून थोडीफार झुंज मिळाली. पण प्रणॉयने आपले वर्चस्व कायम राखले. भारताच्या अनुभवी खेळाडूने २१-१४ असे या गेममध्ये यश मिळवले आणि घोडदौड केली.

भारताला दुहेरी विभागात निराशेला सामोरे जावे लागले. व्यंकट प्रसाद - जुही देवानगन तसेच अश्‍विनी भट - शिखा गौतम या जोड्यांचा पराभव झाला. यामुळे दोन्ही जोड्यांना स्पर्धेमधून बाहेर जाण्याच्या नामुष्कीचा सामना करावा लागला.

संधी गमावली

नोझोमी ओकुहरा हिने पी. व्ही. सिंधूचे आव्हान २१-१४, २१-१४ असे संपुष्टात आणले. सिंधूचा ४४ मिनिटांमध्ये पराभव झाला. पहिल्या गेममध्ये ६-६ अशी बरोबरीनंतर ओकुहरा हिने त्यानंतर १६-१२ व १९-१२ असे पुढे जात पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने सलग ९ गुण मिळवत झोकात पुनरागमन केले. पण तिने ही संधी वाया घालवली. ओकुहरा हिने सहा गुणांची कमाई करीत गेमला कलाटणी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com