esakal | असा जिंकला साताऱ्याने पोलिस कप
sakal

बोलून बातमी शोधा

असा जिंकला साताऱ्याने पोलिस कप

बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचे आगळे वैशिष्ट्य असलेल्या पोलिस कमिशनर कपमध्ये सातारा संघ विजेता ठरला.

असा जिंकला साताऱ्याने पोलिस कप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचे आगळे वैशिष्ट्य असलेल्या पोलिस कमिशनर कपमध्ये सातारा संघ विजेता ठरला. मुदत उलटून गेल्यानंतर प्रवेश घेतलेल्या या संघाने विलंबाचा परिणाम कामगिरीवर होऊ दिला नाही. उत्तम तयारीच्या जोरावर एकच दिवस सराव करून त्यांनी गतविजेत्या रत्नागिरीला शह देत पहिला क्रमांक पटकाविला.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रत्नागिरी शीघ्र कृती दलाला दुसरा, तर पुणे शीघ्र कृती दलास तिसरा क्रमांक मिळाला. चार पोलिस कॉन्स्टेबलच्या संघाने सांगलीत क्रॉसकंट्रीपाठोपाठ या स्पर्धेत करंडक जिंकला. साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या पुढाकारामुळे आणि प्रयत्नांमुळे त्यांना प्रवेश मिळाला. गतवर्षी पहिल्या स्पर्धेच्या वेळी सातपुते संयोजन समितीमध्ये होत्या. त्यांनी या कर्मचाऱ्यांना नाव नोंदविण्यास सांगितले होते. पण, बंदोबस्ताच्या ड्युटीमुळे कुणीच नाव पाठवू शकले नाही. काही दिवसांनी नाव पाठविले का? असे विचारल्यावर शक्‍य झाले नाही, असे त्यांना सांगण्यात आले. मग सातपुते यांनी मुख्य संयोजक विकास सिंग यांच्याशी संपर्क साधला.

'पुणे हाफ मॅरेथॉन'मध्ये गोरखा रेजिमेंटचा तीर्थ पुन विजेता

त्यानंतर अनिल खाडे, अमोल गिरी, राम बेंडकोळी आणि इंद्रजित भोसले यांच्या संघाने बाजी मारली. सातपुते यांनी सांगितले की, मी सांगलीत गेले तेव्हा या धावपटूंची कामगिरी पाहिली. पोलिसांची स्पर्धा वैयक्तिक नव्हे, तर सांघिक पद्धतीने व्हावी, अशी कल्पना आम्ही मांडली. रिले शर्यतीप्रमाणे चार जणांची कामगिरी ग्राह्य धरण्याची संकल्पना चांगली ठरली. या शर्यतीसाठी आम्ही ट्रेनर विजय गायकवाड, फिजिओ देवयानी मोघे यांची मदत घेतली.

रत्नागिरी संघात अरुण वाघ, किरण गरुड, चंद्रमुनी ठोके, योगेश धोंडे यांचा समावेश होता. पुणे संघात शिवाजी नाणेकर, धनंजय बिटाले, दिलीप पवार, बी. मुंडे यांचा समावेश होता.

पारंपरिक आहार
सातारा पोलिस संघातील धावपटूंनी मोड आलेली कडधान्ये, भिजवलेले शेंगदाणे, गूळ असा पारंपरिक आहार घेतला. धावण्याचा संबंध शरीराइतकाच मनाशी असतो, हे सूत्र त्यांनी अंगीकारले आणि त्यानुसार तयारी केल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

बालेवाडी pune half marathon पुणे हाफ मॅरेथॉन    

loading image
go to top