Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित; नमुना चाचणीला नकार, कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेकडून (नाडा) अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनियाला निलंबित करण्यात आले आहे. उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्यामुळे त्यांच्याकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे.
Wrestlers Protest
Wrestlers Protest sakal

नवी दिल्ली : राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेकडून (नाडा) अनुभवी कुस्तीपटू बजरंग पुनियाला निलंबित करण्यात आले आहे. उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्यामुळे त्यांच्याकडून कठोर निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, बजरंगवरील निलंबनाचा निर्णय घेताना आम्हाला अंधारात ठेवण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत जागतिक उत्तेजक विरोधी संघटनेला (वाडा) पत्र लिहिणार असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आशियाई ऑलिंपिक पात्रता फेरीसाठी सोनीपत येथे १० मार्च रोजी निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत पराभूत झाल्यानंतर बजरंग तडकाफडकी तेथून निघून गेला. नाडाला उत्तेजक नमुना चाचणीही त्याच्याकडून देण्यात आली नाही. त्यामुळे नाडाकडून २३ एप्रिलला त्याला निलंबित करण्यात आले आहे. येत्या ७ मेपर्यंत त्याला उत्तर देण्यास सांगितले आहे.

मुदतबाह्य किट वापरल्याबाबत पाऊल?

बजरंग पुनियाने सोशल मीडियावरून या प्रकरणाला उत्तर दिले आहे. तो म्हणाला, मी नाडाच्या अधिकाऱ्यांना नमुना चाचणी देण्यास नकार दिलेला नाही. माझी नमुना चाचणी घेण्यासाठी मुदतबाह्य किट आणण्यात आले होते. यावर तुम्ही कोणते पाऊल उचलणार, असा प्रश्‍न मी त्यांना केला. तसेच त्यानंतर माझी उत्तेजक चाचणी घ्या, असेही सांगितले. माझे वकील आता या प्रकरणावर उत्तर देणार आहेत.

Wrestlers Protest
Bajrang Punia : अपात्रतेनंतरही पुनियाला मंत्रालयाकडून मदत

बृजभूषण यांच्यावरही टीका

बजरंग पुनियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओही टाकला आहे. त्यामध्ये उत्तेजक चाचणीदरम्यान घडलेली घटनाही दाखवण्यात आली आहे. या व्हिडीओमध्ये बजरंग नाडामधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधताना दिसत आहे. तो म्हणतो आहे की, मुदतबाह्य किट वापरण्यामध्ये तुमचा दोष नाही. सर्व पैशांचा खेळ आहे. त्याच्या या वक्तव्यावरून बृजभूषण यांच्यावर त्याने कडाडून टीका केली असल्याचे समजते.

...तर ऑलिंपिकला मुकणार

एखाद्या खेळाडूने उत्तेजक नमुना चाचणीला नकार दिल्यास तर त्याच्याकडून उत्तेजकविरोधी नियमाचे उल्लंघन झाले आहे. जागतिक उत्तेजकविरोधी संघटनेचा हा नियम आहे. आता या प्रकरणात बजरंग दोषी सापडला, तर पॅरिस ऑलिंपिकला त्याला मुकावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com