
FIFA World Cup 2022 : कतारमध्येही CM शिंदेंचा डंका! बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फोटो होतोय व्हायरल
FIFA World Cup 2022 : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन गटांमध्ये तेव्हापासून शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. दरम्यान एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या पाठींब्याने राज्यात सरकार देखील स्थापन केलं. यादरम्यान आता चर्चा होतेय ती कतारमध्ये फुटबॉल स्टेडीयमवर झळकलेल्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पोस्टरची..
सध्या जगभरतार फिफा फुटबॉल विश्वचषकाची धूम सुरू आहे. कोट्यावधी चाहते जहभरातून विश्वचषक सामन्यांचा आनंद घेत आहेत. तर काही चाहते थेट कतारमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं पोस्टर झळकावलं आहे. शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षिरसागर यांनी या कार्यकर्त्यांचा फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा: Gujrat Exit Polls 2022 : मागच्या दोन निवडणुकांत एक्झिट पोल कसे होते? वाचा भाकितं किती ठरली खरी
"कतार मध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचा डंका... कोल्हापूरच्या युवकांनी फुटबॉल सामान्यान दरम्यान झळकवला फलक" अशी फोटोओळ या फोटोला देण्यात आला आहे. पोस्टरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो दिसत आहेत. तसेच या फोटोला सातशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?
हेही वाचा: Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या
दरम्यान यंदा फिफा फुटबॉल विश्वचषक कतारमध्ये खेळवला जात आहे. २० नोव्हेंबरला कतार आणि इक्वेडोर यांच्यातील सामन्याने या जगातील सर्वात मोठ्या क्रिडा स्पर्धेची सुरुवात झाली होती. तसेच यंदाच्या फिफा विश्वचषकात जगभरातून तब्बल ३२ संघ सहभागी झाले होते. तर या विश्वचषकाचा सामने २० नोव्हेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.