Duleep Trophy : व्यंकटेश अय्यरला लागला चेंडू, मैदानात बोलावली रूग्णवाहिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Duleep Trophy Venkatesh Iyer Injury

Duleep Trophy : व्यंकटेश अय्यरला लागला चेंडू, मैदानात बोलावली रूग्णवाहिका

Duleep Trophy Venkatesh Iyer Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू व्यंकटेश अय्यर दुलीप ट्रॉफीतील मध्य विरूद्ध पश्चिम विभाग सामन्यात दुखापतग्रस्त झाला. त्याच्या मानेवर वेगाने चेंडू आदळला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर मैदानवर खाली पडला. घडलेला प्रकार पाहून मैदानावर उभी असलेली रूग्णवाहिका त्वरित मैदानात आली. मात्र सुदैवाने व्यंकटेश अय्यर स्वतः उठून उभा राहिला आणि मैदानावरून चालत बाहेर गेला.

हेही वाचा: Roger Federer : फेडररची पत्नी देखील होती टेनिसपटू मात्र...

दुलीप ट्रॉफीमधील मध्य विभाग विरूद्ध पश्चिम विभाग सामन्यात व्यंकटेश अय्यर फलंदाजी करताना त्याला दुखापत झाली. क्षेत्ररक्षकाने वेगाने केलेला थ्रो थेट अय्यरच्या मानेवर आदळला. त्यामुळे तो मैदानावरच खाली पडला. घडलेली घटना भीतीदायक असल्याने मैदानावर उभी असलेली रूग्णवाहिका त्वरित मैदानात आली. मात्र व्यंकटेश अय्यर स्वतः उभा राहून मैदानाबाहेर गेला. यानंतर व्यंकटेश अय्यर मध्य विभागचा सातवा फलंदाज बाद झाल्यानंतर बॅटिंग करण्यासाठी पुन्हा मैदानात आला. मात्र त्याला फक्त 14 धावाच करता आल्या. ज्यावेळी त्याला चेंडू लागला त्यावेळी तो 6 धावांवर खेळत होता. मात्र अय्यर मध्य विभागच्या फिल्डिंगवेळी मैदानात उतरला नाही.

हेही वाचा: Sanju Samson : आधी T20 वर्ल्डकपसाठी डावलले आता गळ्यात कर्णधारपदाची माळ

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पश्चिम विभागने आपल्या पहिल्या डावात 257 धावा केल्या. यात पृथ्वी शॉने 60, राहुल त्रिफाठीने 67 तर शम्स मुल्लानीने 41 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मध्य विभागाने पहिल्या डावात फक्त 128 धावा केल्या. कर्णधार करण शर्माने सर्वाधिक 34 धावांचे योगदान दिले. दरम्यान, पश्चिम विभागाने आपल्या दुसऱ्या डावात 3 बाद 130 धावांपर्यंत मजल मारली. आहे. यात पृथ्वी शॉच्या एकट्याच्या 104 धावांचा मोठा वाटा आहे. आक्रमक शैलीच्या शॉने 96 चेंडूत 104 धावा चोपल्या.

Web Title: Ball Hit Venkatesh Iyer Neck During Duleep Trophy Ambulance Enter In Stadium

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..