Sanju Samson : आधी T20 वर्ल्डकपसाठी डावलले आता गळ्यात कर्णधारपदाची माळ

Sanju Samson Made a Captain Of India A Team
Sanju Samson Made a Captain Of India A Team esakal

Sanju Samson Captain Of India A : भारताचा विकेटकिपर आणि आक्रमक फलंदाज संजू सॅमसनला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नाही. संजूला डावलल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर आपला रोष देखील व्यक्त केला होता. आता मात्र संजू सॅमसनच्या चाहत्यांना थोडाफार का असेना दिलासा मिळाला आहे. संजू सॅमसनला न्यूझीलंड अ संघाविरूद्ध मायदेशात होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय अ संघाचा कर्णधार करण्यात आले आहे.

Sanju Samson Made a Captain Of India A Team
Hansal Mehta : निवृत्त कोण झालयं? फेडरर की अरबाज? हंसल मेहतांच्या ट्विटने गोंधळ

न्यूझीलंड अ विरूद्ध होणारी ही वनडे मालिका सप्टेंबर 22 पासून सुरू होणार आहे. ही मालिका चेन्नईमध्ये होणार असून या मालिकेतील पुढील दोन सामने हे 25 आणि 27 सप्टेंबरला होणार आहेत. या मालिकेत पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर आणि उमरान मलिक हे स्टार खेळाडू देखील खेळणार आहे.

याच आठवड्यात टी 20 वर्ल्डकपसाठीच्या भारतीय संघाची घोषणा झाली होती. संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. विशेष म्हणजे निवडसमितीने त्याला स्टँड बायमध्येही जागा दिली नाही. त्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या नावाचा ट्रेंड सुरू झाला होता. त्याचे चाहते त्याला डावलल्याबद्दल खूप नाराज होते. आता संजूला भारतीय अ संघाचे कर्णधारपद दिल्याने त्याच्या चाहत्यांची नाराजी थोडीफार दूर होऊ शकते.

Sanju Samson Made a Captain Of India A Team
Babar Azam | सांगत होतो आधी विराटच्या स्तरावर पोहोच मग कॅप्टन्सी कर : कामरान अकमल

भारतीय अ संघ :

पृथ्वी शॉ, अभिमन्यू इश्वरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, संजू सॅमसन (कर्णधार), केएस भरत (विकेट किपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चाहर, तिलक वर्मा, कुलदीप सने, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, नवदीप सैनी, राज अंगद बवा

Sanju Samson Made a Captain Of India A Team
Shahid Afridi : पाकिस्तानकडे खेळाडूंच्या उपचारासाठी नाहीत पैसे?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com