India Women's Cricket Team : एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाचे स्वप्न पाहणाऱ्या भारताला बसला जोरदार झटका

India Women's Cricket Team
India Women's Cricket Teamesakal

India Women's Cricket Team : बीसीसीआयने नुकतेच चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी भारताचा पुरूष आणि महिलांच्या क्रिकेट संघाची घोषणा केली. बीसीसीआय टी 20 फॉरमॅटमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा पूर्ण क्षमतेचा संघ पाठवणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली जात आहे.

मात्र या अपेक्षाला आज तडा गेला. बांगलादेश महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिल्या वनडे सामन्यात 40 धावांनी पराभव करत स्टार संघाला मोठा धक्का दिला. पावसामुळे सामना प्रत्येकी 44 षटकांचा खेळवण्यात आला. (India Women's Cricket Team News)

India Women's Cricket Team
Anil Kumble R. Ashwin : अश्विनने घेतल्या डझनभर विकेट्स तरी कुंबळे म्हणतो 'या' फिरकीपटूला मिळावी संधी

बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 43 षटकात सर्वबाद 152 धावा केल्या होत्या. बांगलादेशची कर्णधार आणि विकेटकिपर निगार सुल्तानेने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली. त्यानंतर फरगाना हकने 27 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली होती.

भारताकडून अमरजीत कौरने 4 तर देविका वैद्यने 2 विकेट्स घेत बांगलादेशला 152 धावात रोखले. बांगलादेशला 152 धावात रोखल्यानंतर भारताची कसलेली फलंदाजी हे आव्हान सहज पार करेल असे वाटले होते.

मात्र डावाची 15 षटके होतात न होतात तोच भारताची अवस्था 5 बाद 61 अशी झाली होती. भारताच्या स्मृती मानधना (Smriti Mandhana), हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues), यस्तिका भाटिया या सगळ्या स्टार फलंदाज स्वस्तात माघारी परतल्या होत्या.

India Women's Cricket Team
Duleep Trophy 2023 Final : पुजारासाठी परतीचे दोर कापले, सूर्याही 'कसोटी'त नापास; विहारीचं नाणं मात्र खणखणीत!

त्यानंतर दिप्ती शर्मा आणि अमरजीत कौरने डाव सावरत भारताला शतकापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र मारूफा अकतरने ही जोडी फोडली अन् भारत पराभवाच्या खाईत ढकलला गेला. देविका वैद्यने नाबाद 10 धावांची खेळी करत झुंज दिली.

मात्र 36 व्या षटकात बारेड्डी अनुशा धावबाद झाली अन् भारताचा पराभव निश्चित झाला. भारताचा संपूर्ण संघ 113 धावात गारद झाला. बांगालेदशकडून मारूफा अकतरने 4 तर राबेया खानने 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com