
नवी दिल्ली : भारतामध्ये २९ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या आशियाई हॉकी करंडकामध्ये पाकिस्तानऐवजी बांगलादेशचा संघ सहभागी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यजमान देश हॉकी इंडियाच्या पदाधिकाऱ्यांकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की, पाकिस्तानी हॉकी संघटनेकडून आशियाई करंडकात खेळण्यास नकार सांगण्यात आल्यास बांगलादेशला संधी देण्यात येईल. आम्ही दोन दिवस प्रतीक्षा करणार आहोत.