esakal | बांगलादेश-श्रीलंका संघांना आयपीएल सोडण्याचा फतवा
sakal

बोलून बातमी शोधा

ipl

बांगलादेश-श्रीलंका संघांना आयपीएल सोडण्याचा फतवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शारजा : आयपीएल अंतिम टप्प्यात आली आहे, अंतिम सामन्यानंतर काही दिवसांतच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. पात्रतेच्या या टप्प्यात बांगलादेश आणि श्रीलंका यांचे संघ खेळणार असल्यामुळे कोलकाता आणि बंगळूर सामन्याअगोदरच राष्ट्रीय ट्वेन्टी-२० संघात दाखल होण्याचे आदेश देण्यात आले.

बांगलादेशचा शकीब अल हसन कोलकाता संघातील खेळाडू आहे, तर वानिंदू हसरंगा आणि दुशमनाथा चमीरा हे श्रीलंकेचे खेळाडू बंगळूर संघातून खेळत आहेत. या खेळाडूंशिवाय कोलकाता-बंगळूर संघांना प्लेऑफचा सामना खेळावा लागणार आहे.

शकीब अल हसन हा बांगलादेशचा हुकमी अष्टपैलू आहे. तो माजी कर्णधारही आहे. बांगलादेशचा संघ सध्या अबुधाबीत आहे आणि त्याला तातडीने संघात दाखल व्हायला सांगितले आहे. बांगलादेशचा आणखी एक प्रमुख खेळाडू मुस्तफिझुर रहमान राजस्थान संघातून खेळत होता. परंतु या संघाचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आल्यामुळे त्याच्यासमोर प्रश्न राहिलेला नाही.

आयपीएल संपल्यासंपल्या लगेचच ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची पात्रता फेरी सुरू होणार आहे; परंतु बांगलादेशचा संघ त्या अगोदर १२ आणि १४ ऑक्टोबर रोजी सराव सामने खेळणार आहे. आता आयपीएलपेक्षा हे सराव सामने त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत. बांगलादेशचा वर्ल्डकपमधील पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी ओमानविरुद्ध होणार आहे.

loading image
go to top