बुद्धिबळ पटावरचा नवा राजा; भरत सुब्रमण्यम भारताचा 73 वा Grandmaster

Bharath Subramaniyam
Bharath SubramaniyamSakal

भारताच्या भरत सुब्रमण्यम (Bharath Subramaniyam) यानं बुद्धिबळाच्या पटावर दिमाखदार कामगिरी केली आहे. त्याने बुद्धिबळच्या पटवरील आपली क्षमता सिद्ध करत देशातील 73 वा ग्रँडमास्टर होण्याचा पराक्रम नोंदवला आहे. रविवारी इटलीमध्ये झालेल्या स्पर्धेत तिसरा आणि अंतिम टप्पा सर करत त्याने ग्रँडमास्टरची उपाधी मिळवली. चेन्नईच्या (Chennai) भरतने 9 राउंडमध्ये 6.5 गुणांची कमाई करत ग्रँडमास्टरचा मान पटकवला. कॅटोलिका येथील आयोजित स्पर्धेत त्याने सातवे स्थान मिळवले. (14 Year Old Bharath Subramaniyam Became India 73rd Chess Grandmaster)

या स्पर्धेत भारताचा एम आर ललित बाबू (MR lalit Babu) याने सात गुणांची कमाई करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्याच्या रुपात भारताला बुद्धिबळाच्या पटावरील नवा आणि उभरता खेळाडू मिळाला आहे. त्याने अव्वल मानांकित युक्रेनच्या एंटोन कोरोबोव (Ukraine) सह तीन अन्य खेळाडूंशी बराबरी करत सर्वोत्तम टाय-ब्रेक स्कोअरच्या माध्यमातून लिलितने जेतपदावर नाव कोरले.

Bharath Subramaniyam
आरे ला कारे! धोनीला ट्रोल करणाऱ्या KKR ला जाडेजाचा कडक रिप्लाय

फेब्रुवारीमध्ये भरतने ग्रँडमास्टर होण्यासाठीचा पहिला मापदंड पार केला होता. इटलीतील स्पर्धेत भरतची लढत ही कोरोबोव (Korobov) आणि ललित बाबू (Lalit Babu) च्या विरुद्ध पराभवाने समाप्त झाली. त्याने या स्पर्धेत दोन पराभव स्विकारले असले तरी सहा विजय आणि एका ड्रॉ च्या जोरावर तो ग्रँड मास्टरचा बनला आहे.

Bharath Subramaniyam
VIDEO : फिल्डर्संनी बॉलरलाच बाउंड्री अडवायला पळवलं!

भरतने फेब्रुवारी 2020 मध्ये मॉस्को येथील Aeroflot Open स्पर्देत 11 वे स्थान पटकावले होते. या स्पर्धेत त्याने ग्रँडमास्टरचा पहिला टप्पा पार केला होता. आक्टोबर 2021 मध्ये 6.5 गुणासह भरतने बुल्गारिया येथे झालेल्या ज्युनिअर राउंड टेबल अंडर 21 स्पर्धेत चौथे स्थान मिळवले होते. या कामगिरीसह त्याने दुसरा टप्पा पार केला होता. त्यानंतर इटलीत त्याने अखेरचा टप्पा सर केला.

ग्रँडमास्टरचा मान कधी मिळतो?

आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ (FIDE) कडून ग्रँडमास्टर (आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर) आणि आंतरराष्ट्रीय मास्टर अशी पदवी बहाल करण्यात येते. बुद्धीबळ क्रीडा प्रकारात एखाद्या खेळाडूला ग्रँडमास्टर होण्यासाठी किमान 2500 "एलो रेटिंगिं" मिळवणे आवश्यक असते. एलो रेटिंग्स याचा अर्थ एफआयडीई रेटिंग असा होता. बुद्धिबळ स्पर्धेत एकमेकांशी बुद्धीबळ खेळांनंतरच्या निकालांवरुन हे रेटिंग दिले जाते. एलो रेटिंग सिस्टम ही 9 गटात विभागलेली असते. उच्च वर्गात 2600 रेटिंगसह याची सुरुवात होते तर निम्न वर्गात 1200 किंवा त्यापेक्षा कमी रेटिंगनं याची सुरुवात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com