PAK vs BAN : टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली मालिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bangladesh vs Pakistan
PAK vs BAN : टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली मालिका

PAK vs BAN : टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली मालिका

sakal_logo
By
सुशांत जाधव

Bangladesh vs Pakistan 2nd T20I : एका बाजूला भारत न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिका सुरु असताना दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात द्विपक्षीय मालिका रंगली आहे. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने बाजी मारलीये. अल्प धावांचा पाठलाग करताना सामन्यात शेवटपर्यंत रंगत पाहायला मिळाली. मोहम्मद रिझवानच्या 39 धावांच्या उपयुक्त खेळीनंतर फखर झमानने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर पाकिस्ताने 8 गडी राखून सामन्यासह मालिका खिशात खातली. याआधी पाकिस्तानने पहिल्या टी-20 सामन्यात 4 गडी राखून विजय नोंदवला होता. पाकिस्तानने जे बांगलादेश दौऱ्यावर करुन दाखवले अगदी त्याच्या उलट प्रकार न्यूझीलंडच्या बाबतती भारत दौऱ्यावर घडलाय. टीम इंडियाने पहिल्या दोन टी-20 सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत मालिका खिशात घातली आहे.

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या बागंलादेश संघाला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी ढाकाच्या मैदानातील दुसरा सामना जिंकणे गरजेचे होते. बांगलादेशचा कर्णधार मोहम्मदुल्लाह याने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय फोल ठरला. पहिल्याच षटकात शाहीन आफ्रिदीनं सैफ हसनला शून्यावर माघारी धाडले.

हेही वाचा: दर्शनची हॅटट्रिक व्यर्थ, विदर्भाला नमवत कर्नाटक फायनलमध्ये

मोहम्मद वासीम ज्यूनीयरने नईमला अवघ्या 2 धावांवर बाद केले. अवघ्या पाच धावांवर 2 विकेट गमावल्यानंतर शँटो आणि अफिफ हुसेन जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अफिफ 20 तर शँटो 40 धावा करुन बाद झाले. या दोघांना शदाब खानने तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तळाच्या फलंदाजीत कुणाला फारसे फटकेबाजी करता आली नाही. परिणामी बांगलादेशचा डाव निर्धारित 20 षटकात 7 बाद 108 धावांत आटोपला.

हेही वाचा: बीजिंग २०२२ हिवाळी ऑलिम्पिकवर राजनीतिक बहिष्कार! चीन म्हणाला...

या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली. मुस्तफिझुरने कर्णधार बाबर आझमला अवघ्या एका धावेवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद रिझवानने फखर झमानच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी पाकिस्तानचा विजय पक्का केला. रिझवान 39 धावा करुन तंबूत परतला. अमिनुल इस्लामने त्याची विकेट घेतली. त्यानंतर दुसऱ्या बाजूला फखर झमानने 51 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 57 धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. सोमवारी ढाकाच्या मैदानातच दोन्ही देशांतील तिसरा आणि अखेरचा टी-20 सामना रंगणार आहे. टी -20 सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळतील. न्यूझीलंडच्या संघाचा भारत दौऱ्याप्रमाणेच पाकिस्तानचा बांगलादेश दौरा निश्चित आहे.

loading image
go to top