
T20 WC Spot Fixing: क्रिकेट जगात भूकंप! महिला T20 WC मध्ये स्पॉट फिक्सिंग; ऑडिओ व्हायरल
Women's T20 World Cup 2023 Spot Fixing : दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बांगलादेश संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे संघाला मैदानावर पराभवाचा सामना करावा लागत आहे तर दुसरीकडे आता संघातील खेळाडूंवर फिक्सिंगचे आरोप होत आहेत.
बांगलादेश महिला संघाची वरिष्ठ खेळाडू शोहेली अख्तर हिच्यावर सहकारी अष्टपैलू लता मंडलला स्पॉट फिक्सिंगसाठी लाखो रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात लता मंडलला संघातून वगळण्यात आले होते. बांगलादेशने हा सामना 8 विकेटने गमावला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांची चौकशी सुरू केली आहे.
बांगलादेशच्या मीडियानुसार, शोहेली अख्तरने स्पॉट फिक्सिंगसंदर्भात आकाश नावाच्या बुकीकडून ऑफर मिळाल्याचे कबूल केले आहे. लता मंडलासोबत झालेल्या संवादादरम्यान अख्तरने आकाशला आपला चुलत भाऊ म्हटले होते. आकाशने शोहेलीला सांगितले की, सर्व खेळाडू भ्रष्ट आहेत. हे चुकीचे सिद्ध करण्यासाठी शोहेलीने लता मंडलला स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिली.
रेवस्पोर्टजने स्पॉट-फिक्सिंगच्या ऑफरबाबत शोहेली अख्तर आणि लता मंडल यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग ऐकले आहे. समोर आलेल्या ऑडिओमध्ये शोहेली अख्तर सुरुवातीला स्पॉट फिक्सिंगची ऑफर देते आणि लता मंडलला म्हणते की घाबरण्यासारखे काही नाही, मी तुला इजा करणार नाही. तुम्हाला करायची असेल फिक्सिंग करा नसेल तर ठीक आहे.
या ऑडिओमध्ये शोहेली लता मंडलला सांगतानाही ऐकू येत आहे की, जर तुम्ही एका सामन्यात चांगली कामगिरी केली तर दुसऱ्या सामन्यात तुम्ही स्टंपिंग करू शकता किंवा विकेट मारू शकता. हिट विकेटसाठी तुम्हाला 20 ते 30 लाख रुपये मिळतील आणि जर स्टंपिंग असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. जर तुम्हाला हे पैसे कमी वाटत असतील तर तुम्ही थेट बोलू शकता.