
हिल हाफ मॅरेथॉनमध्ये राज्यातील विविध भागांतील एक हजार 228 धावपट्टूंनी सहभाग नोंदवला.
सातारा : येथे झालेल्या सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये (Satara Hill Half Marathon) साताऱ्यासह राज्यातील विविध भागांतील एक हजार २२८ धावपट्टूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये सत्तर वर्षांवरील पुरुष गटात छगनलाल भालानी (Chhaganlal Bhalani) यांनी प्रथम क्रमांक मिळवला, खुल्या गटात पुकळेवाडी (ता. माण) येथील बापू पुकळे यांनी, तर महिला गटात मुंबई येथील मनीषा जोशी (Manisha Joshi) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
गेली दोन वर्षे न झालेली हिल हाफ मॅरेथॉन यंदा कोरोनाविषयक सर्व नियम पाळत घेण्याचा निर्णय घेत यासाठीची नोंदणी सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने ऑनलाइन करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धा सुरू झाली. विविध वय आणि किलोमीटर गटांत सुमारे एक हजार २२८ स्पर्धक सहभागी झाले.
स्पर्धेचा निकाल गटनिहाय पुढीलप्रमाणे (अनुक्रमे पहिले तीन विजेते याप्रमाणे) : महिला : खुला गट- मनीषा जोशी (मुंबई), मधुराणी बनसोडे, वैशाली गर्ग. ३० ते ३९ वयोगट- मनीषा जोशी, हिमांगी गोडबोले, स्मिता शिंदे. ४० ते ४९ वगोगट- वैशाली गरग, सयुरी दळवी, श्रीविद्या रामनाथ. ५० ते ५९ वयोगट- क्रांती साळवी, प्रेयसी चारी, शिल्पी मंडल, ६० ते ६९ वयोगट- लता अलीमचंदांनी, आशा शहा, शुभांगी देशपांडे. पुरुष : खुला गट- बापू पुकळे, अनिल कोरवी, धर्मेंद्र कुमार. ३० ते ३९ वयोगट- अनिल कोरवी, धर्मेंद्र कुमार, मल्लीकार्जुन पारडे, ४० ते ४९ वयोगट- सुनील शिवणे, आर. बी. एस. मोनी, जयंत शिवदे. ५० ते ५९ वयोगट- हरीष चंद्रा, पांडुरंग पाटील, विठ्ठल अरगडे. ६० ते ६९ वयोगट- पांडुरंग चौगुले, महिपती सपकाळ, अजित कंबोज, ७० वर्षांवरील वयोगट- छगनलाल भालानी, बाळासाहेब भोगम, राजाराम पवार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.