esakal | धोनीनं केली जडेजाची कॉपी, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ
sakal

बोलून बातमी शोधा

ravindra jadeja and ms dhoni

धोनीनं केली जडेजाची कॉपी, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीग (IPL2021) स्पर्धा अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. स्पर्धा स्थगित झाली असली तरी हटके मुव्हमेंटच्या व्हिडिओमुळे खेळाडू अजूनही चर्चेत आहेत. चेन्नई सुपर किंग्ज फ्रेंचायझीने आपल्या अधिकृत इन्स्टा अकाउंटवरुन कूल कॅप्टन धोनीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालताना दिसतोय.

चेन्नई सुपर किंग्जने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रॉबिन उथप्पा एकत्र बसल्याचे दिसते. धोनी बसल्याजागीच रविंद्र जडेजाची नक्कल करताना पाहायला मिळते. तलवारबाजी स्टाईलमध्ये रविंद्र जडेजाच्या सेलिब्रेशनचा अंदाज सर्वांनाच माहित आहे. याचीच कॉपी धोनीने केल्याचे दिसून येते. धोनीची ही स्टाईल पाहून रॉबिन उथप्पा हसताना दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अक्षरश: धुमाकूळ घालताना दिसतोय.

हेही वाचा: 'धोनी निर्दोष'; 10 वर्षानंतर Ian Bell ला कळली चूक

क्रिकेटच्या मैदानात रविंद्र जडेजा अर्धशतकी किंवा शतकी खेळ करतो त्यावेळी बॅटने तलवारबाजी करत सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते. त्याचा हा अंदाज क्रिकेट चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. धोनीने बॅटशिवाय जड्डूची नक्कल केलेला व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसते. युएईच्या मैदानात प्लेऑफमध्येही स्थान मिळवण्यात अपयशी ठरलेल्या CSK ने यंदाच्या हंगामात दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. 7 सामन्यातील पाच विजयासह संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर राहिला.

हेही वाचा: ..तर हार्दिक पांड्याला ODI आणि T20 संघातूनही डच्चू

रविंद्र जडेजाने या हंगामात दमदार कामगिरी केली. त्याच्याशिवाय मोईन अली, फाफ ड्युप्लेसीस यांनीही चेन्नईसाठी मोलाचे योगदान दिले होते. बायोबबलच्या वातावरणात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर स्पर्धा स्थगित करावी लागली. कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूनंतर चेन्नईच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला होता.

loading image