Video : धडकी भरवणारी झेप, नेटकरी टीम इंडियाला देतायत मॅकार्थीकडून शिकायचा सल्ला...

टी-20 क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक आश्चर्यकारक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे मात्र...
 Barry McCarthy sensational fielding stops
Barry McCarthy sensational fielding stops

T20 World Cup 2022 : टी-20 क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये आतापर्यंत एकापेक्षा एक आश्चर्यकारक क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आहे. या स्पर्धेत अनेकवेळा खेळाडूंनी आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकली आहेत. परंतु सोमवारी ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर दाखवलेले दृश्य खरोखरच अप्रतिम होते.

आयर्लंडचा खेळाडू बॅरी मॅककार्थीने क्षेत्ररक्षणाचा असा प्रयत्न केला की सर्वांनाच थक्क केले. मॅककार्थीने सीमारेषेवर अप्रतिम डाइव्ह मारून षटकार रोखला. त्याचा हा प्रयत्न इतका नेत्रदीपक होता की स्टेडियममध्ये बसलेले सर्व प्रेक्षक त्याच्या सन्मानार्थ उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 Barry McCarthy sensational fielding stops
Virat Kohli Leaked Video: कोहलीच्या रूम मधला व्हिडिओ व्हायरल करणारा सापडला; हॉटेलने केली 'ही' कारवाई

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसने फलंदाजी करताना लॉग-ऑनच्या दिशेने हवेत चेंडू मारला. चेंडू बॅटला लागला आणि हवेत उंच गेला, त्यादरम्यान बेकी मॅकार्थी चेंडूच्या खाली धावला आणि त्याने सीमारेषेवर उंच उडी मारून हवेत चेंडू पकडला आणि तो मैदानाच्या आत फेकला. मॅकार्थीचा प्रयत्न पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. मात्र यानंतर सोशल मीडियावर वेगळ्या चर्चा रंगल्या. काल झालेल्या सामन्यात विराट कोहलीने सोपा झेल सोडला. त्यामुळे नेटकरी नेटकरी टीम इंडियाला म्हणत आहे की मॅकार्थीकडून काय तरी शिका.

 Barry McCarthy sensational fielding stops
VIDEO : पुन्हा चहलचा मैदानात आगाऊपणा, अंपायरला गेला मारायला अन्...

या सामन्याबद्दल बोलताना आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर कर्णधार अॅरॉन फिंच (63) आणि मार्कस स्टॉइनिस (35) यांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 179 धावा केल्या. हा सामना जिंकण्यासाठी आयरिश संघाला 20 षटकात 180 धावा करायच्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com