
Basketball federation dispute Maharashtra
Sakal
नागपूर : महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत पात्र सदस्यांच्या यादीपैकी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या नावावर महा बास्केटबॉल संघटनेने आक्षेप घेतला आहे.
बास्केटबॉलमध्ये दोन संघटना कार्यरत असेल आणि त्यांच्यात वादविवाद तसेच कोर्ट केस सुरू असेल तर, त्यापैकी एकाच संघटनेला मतदानाचा अधिकार कसा काय दिला जाऊ शकतो, असा प्रश्न उपस्थित करून न्याय न मिळाल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा, महा बास्केटबॉल संघटनेचे सचिव शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारविजेते शत्रुघ्न गोखले यांनी मंगळवारी (ता. २३) पत्रकार परिषदेत दिला.