फलंदाजाचं ऐकून अंपायरनं OUT चा निर्णय बदलला; व्हिडिओ व्हायरल |Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BBL

फलंदाजाचं ऐकून अंपायरनं OUT चा निर्णय बदलला; व्हिडिओ व्हायरल

ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेच्या 11 व्या हंगामातील सामन्यादरम्यान हा प्रकार अनुभवायला मिळाला.

Big Bash League Cricket Viral Video : क्रिकेटच्या मैदानात अंपायरचा निर्णय अंतिम मानला जातो. बऱ्याचदा अंपायरच्या नजर चुकीनं फलंदाजाला नाहक विकेट फेकावी लागते. त्यानंतर अंपायरला ट्रोल केल्याचे किस्से आपण पाहिले असतील. पण अंपायरने फलंदाजाचं ऐकून निर्णय बदलल्याचे तुम्ही कदाचित पाहिले नसेल. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग स्पर्धेच्या 11 व्या हंगामातील सामन्यादरम्यान हा प्रकार अनुभवायला मिळाला. या स्पर्धेतील 31 व्या सामन्यात असं काही घडलं की क्रिकेट चाहते त्या व्हिडिओवर अक्षरश: तुटून पडले आहेत. अनेक समिश्र प्रतिक्रिया यावर उमटताना दिसते.

पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) आणि मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना पर्थच्या संघाने 50 धावांनी जिंकला. सामन्यादरम्यान खेळाडू आणि प्रेक्षक अंपायरच्या एका सीनवर आश्चर्यचकित झाल्याचे पाहायला मिळाले. अंपायरच्या एका निर्णयामुळे सामन्याला कलाटणी मिळाली, असा युक्तीवादही या निर्णयानंतर करण्यात येत आहे.

पर्थचा कर्णधार एश्टन टर्नरने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टर्नरने 142.11 च्या स्ट्राइक रेटनं 19 चेंडूत 27 धावा केल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावरच पर्थ संघाने निर्धारित 20 षटकात 180 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्टिस पीटरसनने 50, कॉलिन मुन्रोने 40 आणि एश्टन एगरने 19 धावांची भर घातली. या धावसंख्येचा पाठलाग करताना मेलबर्न स्टार्सचा डाव 18.5 षटकात 130 धावांत आटोपला. जोए क्लार्कने 52 तर टॉम रोजर्सने 32 धावांची खेळी केली.

अन् अंपायरने बदलला निर्णय

पर्थच्या डावातील 14 व्या षटकात टर्नर फलंदाजी करत होता. मेलबर्न स्टार्सकडून जेवियर क्रोनेनं टाकलेला चेंडू टर्नला खेळता आला नाही. विकेटमागे यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू जाताच अपील झाली आणि अंपायने फलंदाजाला बाद दिले. टर्नरने अंपायरला इशारा केला. बॅट आणि बॉलचा संपर्कच झाला नाही असे त्याने अंपायरला सांगितले आणि अंपायरलाही ही गोष्ट पटली. आउट दिलेला निर्णय अंपायरने मागे घेतला. तीन सेकंदात अंपायरने निर्णय बदलला आणि विकेटचा आनंद गायब झाला.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top