esakal | 4,0,4,4,4,2 'नव्हर्स नाइंटी' धमाकेदार खेळीनंतर स्टॉयनिसचं शतक हुकलं; पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Melbourne Stars,Hobart Hurricanes,Marcus Stoinis, CricketNews

Big Bash League : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीगमधील 27 व्या सामन्यात मेलबर्नचा सलामीवीर आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने धमाकेदार इनिंग खेळली. स्टॉयनिस आणि आंद्रे फ्लेचरने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न स्टार्स सघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 11 धावा असताना पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आंद्रेनं स्टॉयनिसची साथ सोडली.

4,0,4,4,4,2 'नव्हर्स नाइंटी' धमाकेदार खेळीनंतर स्टॉयनिसचं शतक हुकलं; पण...

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

Big Bash League : ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय बिग बॅश लीगमधील 27 व्या सामन्यात मेलबर्नचा सलामीवीर आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने धमाकेदार इनिंग खेळली. स्टॉयनिस आणि आंद्रे फ्लेचरने प्रथम फलंदाजी करणाऱ्या मेलबर्न स्टार्स सघाच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 11 धावा असताना पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर आंद्रेनं स्टॉयनिसची साथ सोडली.

निक लॅरकिनही फार काळ टिकला नाही. मॅक्सवेलच्या रुपात संघाला 49 धवांवर मोठा धक्का बसला. पण आघाडी कोलमडल्यानंतर स्टॉयनिसने धमाकेदार खेळी करत संघाला 6 बाद 186 धावांवर पोहचवली. मार्कस स्टॉयनिस या स्पर्धेत मागील सामन्यात सपशेल अपयशी ठरला होता. मात्र त्याने मागील कामगिरी विसरुन संघाला संकटातून बाहेर काढणारी खेळी केली.

97 धावा करुन तो नाबाद परतला. अवघ्या 3 धावांनी त्याचे शतक हुकले. 55 चेंडूत त्याने 7 चौकार आणि 7 षटकार खेचले. मागील चार सामन्यात मार्कस स्टॉयनिसच्या नावे केवळ 2 धावा होत्या. आता यंदाच्या हंगमात त्याच्या नावे 5 सामन्यात 99 धावा झाल्या असून धावांची सरासरी 19.8 वर पोहचली आहे.

"ब्रिस्बेनमधील ऑस्ट्रेलियन संघाच्या रेकॉर्डमुळे टीम इंडियाला धडकी भरलीय"

युएईमध्ये रंगेलल्या आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून त्याने लक्षवेधी खेळी केली होती. बीबीएलमध्ये तो शतकी खेळी करेल असे वाटले होते. अखेरच्या षटकात त्याने 4,0,4,4,4,2 अशा 18 धावा केल्या. आणि शतकापासून 3 धावा दूर राहिला. त्याचे शतक व्हायला हवे होते, अशी भावना त्याच्या क्रिकेट चाहत्यांमधून व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरील ट्रेंडिगमध्ये याची जोरदार चर्चा सुरु आहे.  

या धावांचा पाठलाग करताना होबर्ट हॅरिकन्सचा संघ 6 बाद 173 धावांत आटोपला. मेलबर्न स्टार्सने हा सामना 10 धावांनी जिंकला असून स्टॉयनिसची खेळी व्यर्थ ठरली आहे. होबार्ट हॅरिकन्सने बेन मॅकडेरमॉटने सर्वाधिक 91 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय अन्य एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही.

loading image