esakal | ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ
sakal

बोलून बातमी शोधा

Team India

ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

sakal_logo
By
सुशांत जाधव

Virat Lead T20 squad for ICC World Cup : युएई आणि ओमानच्या मैदानात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने बुधवारी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. 17 आक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत युएईच्या मैदानात वर्ल्ड कप स्पर्धा रंगणार आहे.

अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याला संघात स्थान देण्यात आले आहे. दुसरीकडे फिरकीपटूंमध्ये अश्विनवर भरवसा दाखवण्यात आलाय. रिषभ पंतच्या जोडीला ईशान किशनला दुसरा यष्टीरक्षक म्हणून पसंती देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत मध्यफळीत खेळताना दिसलेल्या श्रेयस अय्यरच्या नावाचा समावेश हा स्टँडबाय खेळाडूंच्या यादीत करण्यात आला आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असून या दोन्ही संघाशिवाय न्यूझीलंड आणि अफगानिस्तान यांचाही या गटात समावेश आहे. पहिल्या गटात गत वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे.

हेही वाचा: T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर

loading image
go to top