esakal | T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!
sakal

बोलून बातमी शोधा

MS-Dhoni

T20 World Cup 2021: Dhoni is Back! BCCIने दिली नवी जबाबदारी!

sakal_logo
By
विराज भागवत

T20 World Cup 2021 साठी गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहणाऱ्या क्रीडारसिकांना अखेर आज टीम इंडियातील शिलेदार सजमले. BCCIच्या निवड समितीने प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला. या संघात काही नावे अपेक्षित होती, तर काही खेळाडूंची नावे वगळण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या संघासोबत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचेही नाव घोषित करण्यात आले. त्याला एका नव्या जबाबदारीसह संघासोबत ठेवण्यात आले. BCCIचे सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली.

हेही वाचा: Video: कैफने केला 'नागिन डान्स'; सेहवागला दिलेला शब्द पाळला!

टी२० विश्वचषकासाठी कोणाला संधी, कुणाला वगळलं?

BCCIच्या बैठकीत काही अपेक्षित तर काही अनपेक्षित असे निर्णय घेण्यात आले. विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांना अपेक्षेप्रमाणे स्थान मिळाले. तर, इशान किशन, हार्दिक पांड्या, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती यांना लॉटरी लागली.

Team India

Team India

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यात फलंदाजाच्या जागेसाठी शर्यत होती, त्यात किशनला १५ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले तर श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंच्यात जागा मिळाली. शार्दूल ठाकूर याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याला संघात जागा मिळेल असे वाटत होते, पण निवड समितीने हार्दिक पांड्यावर विश्वास दाखवला आणि शार्दूलला राखीव ठेवले. त्यासोबत, वेगवान गोलंदाज दीपक चहर यालाही राखीव खेळाडूंमध्ये स्थान दिले गेले. महत्त्वाची बाब म्हणजे, कसोटी मालिकेत सातत्याने संघाबाहेर बसवण्यात आलेल्या रविचंद्रन अश्विनला १५ जणांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच्यासोबतच वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे दोन फिरकीपटूही संघात आहेत.

हेही वाचा: ICC T20 World Cup : टीम इंडियाची घोषणा, असा आहे संघ

कोणते मोठे खेळाडू राहिले संघाबाहेर?

मुंबईकर पृथ्वी शॉ आणि डावखुरा सलामीवीर शिखर धवन या दोघांनाही संघात स्थान मिळालेले नाही. विराटचा लाडका असलेल्या युजवेंद्र चहललाही संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यासोबत, संजू सॅमसन, कृणाल पांड्या यांनाही संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर, वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे संघातून आपोआपच बाहेर झाला आहे.

हेही वाचा: Test Rankings: शार्दूलची गरूडझेप, बुमराहला बढती; अश्विनची घसरण

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविचंद्रन जाडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुन चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर

loading image
go to top