IND vs SA T20 : स्टेडियम 100 टक्के गजबजणार; BCCI ची मान्यता | Cricket | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bcci c

IND vs SA T20 : स्टेडियम 100 टक्के गजबजणार; BCCI ची मान्यता

नवी दिल्ली : बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निर्णयानंतर आता स्टेडियमच्या क्षमतेनुसार 100 टक्के प्रेक्षकांना मैदानावर येऊन सामन्याचा आनंद घेता येणार आहे. यापूर्वी बीसीसीआयने स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घातली होती. 2020 मध्ये कोरोना महामारीने डोकं वार काढल्यापासून प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे नियम करण्यात आले होते. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे. (IND vs SA T20 Series )

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यापूर्वीच्या अनेकसामन्यांमध्ये मैदानातील प्रेक्षकांच्या येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. यानंतर काही दिवसांपूर्वी प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर स्टेडियमच्या क्षमतेनुसार 50 किंवा 75 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली. मात्र, आता प्रेक्षकांच्या येण्यावरचे निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. दरम्यान, या प्रकरणी बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी, भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत प्रेक्षकांना मैदानावर जाऊन टी-20 सामन्याचा आनंद घेता येणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

9 जून ते 19 जून रंगणार मालिका

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 9 जून ते 19 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनला भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. भारताचा कसोटी संघ 15 किंवा 16 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या संघासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही इंग्लंडला रवाना होणार आहेत. अशा परिस्थितीत एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण यांना भारताच्या टी-20 संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. त्याचबरोबर शिखर धवन संघाचा कर्णधार होऊ शकतो.

टी-२० मालिकेचे वेळापत्रक

पहिला सामना : 9 जून, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली

दुसरा सामना : 12 जून, बाराबती स्टेडियम, कटक

तिसरा सामना : 14 जून, वायएस रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टणम

चौथा सामना : सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट

पाचवा सामना : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू.