Women's IPL : 5 संघांसाठी बीसीसीआयला मिळाले फ्रेंचायजी; कमावला 4669.99 कोटींचा गल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women's Premier League

Women's IPL : 5 संघांसाठी बीसीसीआयला मिळाले फ्रेंचायजी; कमावला 4669.99 कोटींचा गल्ला

Women's Premier League : महिला आयपीएलसाठी बीसीसीआयला 5 संघांसाठी फ्रेंचायजी मिळाले आहेत. बीसीसीआयने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार संघांच्या लिलावातून बीसीसीआयला 4 हजार 669 कोटी रूपयांची कमाई झाली आहे. पुरूषांच्या आयपीएलमधील अनेक संघांनी महिला आयपीएलमधील देखील संघ खरेदी करण्यासाठी उत्सुकता दाखवली होती. मात्र यातील अनेकांनी ऐनवेळी माघार घेतली.

हेही वाचा: Australia Open 2023 : सानिया मिर्झा अन् रोहन बोपण्णाने गाठली मिश्र दुहेरीची अंतिम फेरी

बीसीसीआयने जाहीर केलेल्या यादीनुसार महिला आयपीएलसाठी अहमदाबाद, मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि लखनौ या शहरांची निवड करण्यात आली होती. अहमदाबादचा संघ अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड यांनी तब्बल 1289 कोटी रूपयांना खरेदी केला. तर मुंबईचा संघ इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 912.99 कोटी रूपयांना खरेदी केली.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने पुरूषांप्रमाणे महिला आयपीएलमध्ये बंगळुरूचा संघ खरेदी केला. त्यासाठी त्यांनी 901 कोटी रूपये खर्च केले. यानंतर दिल्लीचा संघ देखील JSW GMR ने 810 कोटी रूपये खर्चून आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. लखनौचा संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने 757 कोटी रूपयांना खरेदी केला.

हेही वाचा: Mohammad Azharuddin : आमचं एकमतानं ठरायचं... पाकच्या माजी क्रिकेटपटूचा अझहरूद्दीनबाबत मोठा खुलासा

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी महिला आयपीएलच्या संघांचा विक्रमी लिलाव झाल्यानंतर ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'आजचा दिवस क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामासाठीच्या संघांचा विक्रमी लिलाव झाला आहे. विशेष म्हणजे 2008 मध्ये पुरूषांच्या झालेल्या आयपीएल हंगामावेळी संघांवर जेवढी बोली लागली होती त्यापेक्षाही जास्त बोली महिला आयपीएल संघांवर लागली आहे.'

जय शहा पुढे म्हणाले की, 'बोली जिंकलेल्या सर्वांचे अभिनंदन आम्ही यातून एकूण 4669.99 कोटी रूपये कमावले आहेत.'

हेही वाचा: Mohammad Azharuddin : आमचं एकमतानं ठरायचं... पाकच्या माजी क्रिकेटपटूचा अझहरूद्दीनबाबत मोठा खुलासा

जय शहा ट्विट करत म्हणाले की, 'ही महिला क्रिकेटमधील एक क्रांती आहे. यामुळे फक्त महिला क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलणार नाहीये तर संपूर्ण खेळ जगतात मोठे बदल होणार आहेत. महिला आयपीएल महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल घडवून आणेल. यामुळे महिला क्रिकेटमधील सर्व घटकांना फायदा होणार आहे.'

जय शहांनी महिला आयपीएलचे अधिकृत नाव देखील जाहीर केले. ते म्हणाले की, बीसीसीआयने महिला आयपीएलचे अधिकृत नाव हे महिला प्रीमियर लीग (Women's Premier League) WPL असे असले. महिला प्रीमियर लीगचा प्रवास सुरू होतोय.'

(Sports Latest News)

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?

टॅग्स :CricketIPLWomen Cricket