भारतीय संघाचा सपोर्ट स्टाफ जाहीर; अखेर 'हेच' झाले बॅटींग कोच

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : बीसीसीआयने आज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्यांची नावे जाहीर केली. यामध्ये बहुप्रतिक्षित जागेसाठी म्हणजेच फलंदाजी प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज असलेले विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमुख प्रशिक्षकांप्रमाणे यांची नियुक्ती देखील 2021मध्ये होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकापर्यंत करण्यात आली आहे. 

Ashes 2019 : बंदीनंतर तीन डावांत नंबर वन? हा स्मिथ वेडा आहे का?

भारतीय संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांची नियुक्ती कायम राहिली आहे. सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीनंतर एमएसके प्रसाद यांच्या निवड समितीने शॉर्टलिस्ट असलेल्यांची नावे प्राधान्य क्रमाने जाहीर केली होती. ही नवी प्रथा यंदा प्रथमच सुरु झाली. त्यानुसार बांगर यांच्याऐवजी राठोड यांना मिळालेली पसंती बांगर यांच्या गच्छंतीचे संकेत देत यापूर्वीच देत होती.

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न व्यवस्थितपणे न सोडवल्याबद्दल फलंदाजीचे प्रशिक्षक बांगर यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्याचवेळेपासून त्यांचे स्थान धोक्‍यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI Announces Indian National Cricket Teams Support Staff