esakal | बीसीसीआय होणार आणखी मालामाल
sakal

बोलून बातमी शोधा

bcci

बीसीसीआय होणार आणखी मालामाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे (corona) सर्वांची आर्थिक गणिते बिघडलेली असली तरी क्रिकेट विश्वातील सर्वांत श्रीमंत असलेली बीसीसीआयची (BCCI) तिजोरी आणखी गलेलठ्ठ होणार आहे. पुढील मोसमासाठी नियोजित असलेल्या दोन फ्रँचाईसमधून बीसीसीआयला तब्बल पाच हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

सध्याची आयपीएल आठ संघांची आहे. २०२२ पासून यात दोन नवे संघ येणार आहेत. नुकत्याच झालेल्या आयपीएल प्रशासन समितीच्या बैठकीत नव्या मॉडेलची तयारी करण्यात आली. नव्या फ्रँचाईसीसाठी लिलाव कागदपत्रे घेण्यासाठी ७५ कोटी बीसीसीआयला द्यावे लागणार आहेत. अगोदर झालेल्या चर्चेनुसार नव्या फ्रँचाईसीसाठी १७०० कोटी रुपयांची पायाभूत किंमत ठेवण्यात येणार होती, परंतु आता हीच किंमत २ हजा कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले, किमतीत थोडीफार जरी वाढ झाली, तरी बीसीसीआयला पाच हजार कोटी मिळतील, असेही सांगण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरपासून नव्या फ्रँचाईससाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

हेही वाचा: 'मुंबई इंडियन्स'चा स्टार खेळाडूला कन्यारत्न; फोटो केला पोस्ट

कोण असतील शर्यतीत

ज्या कंपन्यांची उलाढाल तीन हजार कोटींपेक्षा अधिक आहे, त्यांनाच लिलाव प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. अदानी समूह, संजीव गोयंका यांची आरपीजी कंपनी तसेच नामवंत फार्मा कंपनी टॉरेंट आणि एक मोठी बँकिंग कंपनी नव्या फ्रँचाईससाठी उत्सुक असल्याचे समजते.

नव्या फ्रँचाईससाठी बीसीसीआयने तयार केलेल्या नव्या नियमानुसार एका संघाच्या मालकीसाठी तीन वेगवेगळ्या कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्रितपणे बोली लावली तर त्यांना मान्यता देण्यात येणार नाही, परंतु एकाच पद्धतीचा व्यवसाय असलेल्या तीन कंपन्या एकत्र आल्या तर त्यांना मान्यता दिली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: "आक्रमकपणा विराटला भोवतोय, त्याची सत्ता गाजवण्याची सवय..."

किती होती अगोदरच्या फ्रँचाईसीची किंमत

२००८ मध्ये आयपीएल सुरू होत असताना झालेल्या फ्रँचाईसीचा लिलाव डॉलरमध्ये झाला होता. (त्या वेळी एक डॉलरचे मुल्य ३५ रुपये होते.)

मुंबई इंडियन्स : ११ कोटी १९ लाख डॉलर

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु : ११ कोटी १६ लाख डॉलर

डेक्कन चार्जर्स : १० कोटी ७ लाख डॉलर

चेन्नई सुपर किंग्ज : ९ कोटी १० लाख डॉलर

दिल्ली डेअरडेव्हिल्स : ८ कोटी ४० लाख डॉलर

किंग्ज इलेव्हन पंजाब : ७ कोटी ६० लाख डॉलर

कोलकाता नाईटरायडर्स : ७ कोटी ५० लाख डॉलर

राजस्थान रॉयल्स : ६ कोटी ७० लाख डॉलर)

loading image
go to top